रामटेक विधानसभेत आता ट्वेंटी-ट्वेंटी मॅच

– प्रत्येक बॉलवर सिक्स मारल्यास मुळक राजेंद्र बनणार विजेंद्र (विजयी होणार)मात्र हॅट्रिक मिळविणारे गोलंदाज आशिष जयस्वाल अनुभवी व विक्रमी असल्याने , दहा वर्षांपूर्वी कामठी विधानसभेत आ. बावनकुळे कडून क्लीन बोल्ड झालेले मुळक झेलबाद होण्याचीच दाट शक्यता

कोदामेंढी :- नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर असल्याने मिनी अयोध्या म्हणून परिचित असलेल्या रामटेक विधानसभेत आज 18 नोव्हेंबर पासून प्रचार तोफा थंडावल्याने उद्या 19 पहाटेपासून ते रात्री कत्ल की रात पर्यंत छुप्या प्रचारा निमित्त येथे ट्वेंटी-ट्वेंटी सामना रंगणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. येथे बॅट या निवडणूक चिन्हावर महाविकास आघाडी घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे बंडखोर उमेदवार फलंदाज राजेंद्र मुळक यांच्या सामना रामटेक चे विद्यमान या विधानसभा क्षेत्रात हॅट्रिक करणारे गोलंदाजआशिष जयस्वाल यांच्याशी होणार असल्याची चर्चा आहे. या क्षेत्रातील दांडगा जनसंपर्क असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन किरपान (शिलाई मशीन), पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे (टॉर्च), विजय हटवार (गॅस सिलेंडर )व दोन वर्षापासून या पीचवर सराव करत असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल बरबटे ( मशाल )यांनी प्रचार संपता संपता हम भी किसी से कम नही, लढतीत हम मे भी दम है , असे म्हणत लढतीत चुरस आणलेली आहे. त्यामुळे येथील फलंदाज मुळक राजेंद्र यांना एक, दोन, तीन ,चार असे रण न काढता, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी टेस्ट मॅच, उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते प्रचार संपेपर्यंत वनडे मॅच तर आता उद्या आता उद्या 19 नोव्हेंबर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात दहा वर्षांपूर्वी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कामठी विधानसभेत क्लीन बोल्ड झालेले, मागील दहा वर्षापासून रामटेक विधानसभा या पीचवर फलंदाज म्हणून सराव करत असलेले राजेंद्र यांना विजेंद्र (विजय प्राप्त करण्यासाठी) ठरण्यासाठी प्रत्येक चेंडूवर सिक्सर मारायचे आहे, मात्र प्रत्येक चेंडूवर सिक्सर मारताना रामटेक विधानसभा या पीचवर मागील 25 वर्षापासून हॅट्रिक केलेले गोलंदाज आशिष जयस्वाल यांचे क्षेत्ररक्षण व गोलंदाजी घातक असल्याने, त्यातच मुळक यांचे एक ,दोन ,तीन ,चार रन अडविण्यासाठी या पीचवर सध्या उपस्थित असलेले धुरंधर क्षेत्ररक्षक किरपान,चौकसे, बरबटे , हटवार डोळ्यात तेल घालून उपस्थित असल्याने मुळक झेलबाद होण्याचीच दाट शक्यता राजकीय जाणकार वर्तवित आहे व अशीच दाट चर्चा रामटेक विधानसभा अंतर्गत येणाऱ्या अरोली – कोदामेंढी जि प क्षेत्रात सध्या थंडीचे दिवस सुरू असल्याने शेकोटी शेकताना नागरीकांमध्ये सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजधानीत इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

Tue Nov 19 , 2024
नवी दिल्ली :- देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात, निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त निवा जैन , सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!