लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य

नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटविण्याकरीता मतदान ओळखपत्रासह (EPIC) 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरलेले आहे.

नागपूर आणि रामटेक लोकसभा क्षेत्रात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी स्वतःची ओळख पटविण्याकरीता निवडणूक आयोगाने बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहे. त्यामुळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान करतांना मतदारांची ओळख पटविणे शक्य होणार आहेत. या ओळखपत्रात आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, कामगार मंत्रालयाने जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र व राज्य सरकार / पीएसयू / पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे, खासदार, आमदार यांना जारी केलेल्या अधिकृत ओळखपत्रांचा समावेश आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही. ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्रीराम नामाच्या जयघोषाने दुमदुमले अवघे चंद्रपूर!

Thu Apr 18 , 2024
– आकर्षक रोषणाई व आतषबाजीने वेधले चंद्रपूरकरांचे लक्ष – अभूतपूर्व उत्साहाने वातावरण भक्तीमय – पोलिसांच्या चोख बंदोबस्तात निघाली शोभायात्रा चंद्रपूर :- आकर्षक रोषणाई… लक्षवेधक आतषबाजी… श्रीराम नामाचा जयघोष… अभूतपूर्व उत्साह आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले चिमुकले… यामुळे अवघे चंद्रपूर श्रीरामनवमीच्या भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले. ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी अवघे चंद्रपूर दुमदुमले. शहरातील मुख्य रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पोलिसांच्या चोख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com