संदीप कांबळे, कामठी
-तीन दिवसात मूर्ती अवमाननेची दुसरी घटना
कामठी ता प्र 29:- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या संजय नगर बंगला कॉलोनी स्थित प्राचीन शितला माता मंदिरात मूर्ती ची अवमानना केल्याचा प्रकार रविवारी सकाळी सहा वाजता निदर्शनास आली होतो या घटनेला विराम मिळत नाहो तोच आज मंगळवारी नजीकच्या जुनी खलाशी लाईन मांग मोहल्ल्यातील प्राचीन मुत्तल्या माता मंदिरातील मूर्तीच्या डोळ्याला लावलेले चांदी चोरून नेल्याची घटना निदर्शनास आली .
प्राप्त माहितीनुसार सदर मंदिराची मांग मोहल्ला रहिवासी संजुभाऊ पांगळुकर मंदिरात पूजा अर्चना करीत असतात यानुसार आज सकाळी मंदिराचे दार उघडून मंदिरात प्रवेश केला असता मूर्तीचे चांदीचे डोळे अज्ञात आरोपीने काढून नेल्याची घटना निदर्शनास येताच एकच धक्का बसला.घटनेची माहिती सर्वत्र पसरताच भक्तगणांच्या भावना दुखवाल्या.घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त लावून अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक अनोळखी तरुणी मंदिर परिसरातून जाताना दिसत आहे.पोलीस त्या दिशेने तपास करीत आहे.मात्र तीन दिवसात मंदिरातील मूर्ती अवमाननेची ही दुसरी घटना असल्याने परिसरात पोलीस प्रशासना विरोधात नाराजगीचा सूर वाहत आहे.