कामठी तालुक्यात दिवाळी पर्व हर्षोल्लाहसात साजरा.       

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कामठी तालुक्यात दिवाळी पर्व मोठ्या हर्षोल्लाहसाने साजरे करण्यात आले. दिवाळी निमित्ताने काल 24 ऑक्टोंबरला सकाळपासूनच नागरिकांमध्ये उत्सुकता होती. तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागतोल गृहिणींनी सकाळपासूनच आपापल्या अंगणाची स्वच्छता तसेच रांगोळी काढताना दिसून आल्या तर शहरातील मुख्य बाजारपेठ गुजरी बाजार, गोयल टॉकीज रोड परिसर तसेच गांधी चौकासह आदी ठिकाणी आम्रपान, केळीची पाने, गेंदफुल खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी दिसून आली तसेच दिवणालीपेक्षा पणत्यांच्या दुकानात खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

त्याचप्रमाणे येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कपडे, दागिने आदींची मोठ्या प्रमाणात खरेदी केली तसेच दिवाळीचा दिवस असल्याने सायंकाळी 8 वाजेसुमारास घरोघरी श्री महालक्ष्मीच्या पूजा अर्चनेची सुरुवात केल्यानंतर आतिषबाजी तसेच फटाक्यांचा आवाज सुरू झाला. तर याही आनंदाच्या प्रसंगी नेहमीप्रमाणे नोकरी असलेल्या रात्रपाळीच्या पोलीसानी कुटुंबाशी दूर राहण्याच्या नाईलाजास्तव पोलीस स्टेशन मध्येच रोषणाई व फुलझडी तसेच अनार जाळून आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळीच्या आनंदावर विरजन..

Tue Oct 25 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 28:-कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांचे हातात पीक येण्याच्या तोंडावर पावसामुळे बळीराजा हा आर्थिक विवंचनेत अडकला असून आनंदाचा व उत्साहाचा मानला जाणारा दिवाळी पर्व च्या आनंदावर कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांवर विरजण पडले . कामठी तालुक्यातील शेतकरीवर्ग, शेतमजूर, कामगार, मजुरवर्ग यांच्यामध्ये दिवाळीच्या पर्वावर जो आनंद असायला पाहिजे ते कुणाच्याही चेहऱ्यावर फुलताना दिसत नाही सर्वत्र निराशाजनक वातावरण असून दिवाळीच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights