माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई :- भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मंत्रालयातील उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. इंदिरा गांधी यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त सौनिक यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र.रा. पेटकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विभागीय आयुक्तालयात अभिवादन

Mon Nov 20 , 2023
नागपूर :- भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त चंद्रभान पराते व प्रदीप कुळकर्णी यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपायुक्त कुळकर्णी यांनी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली. नाझर अमित हाडके, सहायक अधिक्षक अक्षय रोटकर यांच्यासह कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com