हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली भेट

मुंबई :- महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रशेखर आजाद नगर (भापरा) या हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या मध्य प्रदेशातील जन्मस्थळाला भेट दिली. “भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध तरुणांना एकत्र करुन क्रांतिकारक लढा देणाऱ्या आणि हौतात्म्य पत्करणाऱ्या चंद्रशेखर आजाद यांच्या स्वप्नातील सुराज्य साकारण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे”, अशा भावना यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

मंत्री मुनगंटीवार सध्या मध्यप्रदेश राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी अलिरजपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील भापरा (चंद्रशेखर आजाद नगर) येथील हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला स्थानिक लोकप्रतिनिधी- पदाधिकारी यांच्यासह सोमवारी भेट दिली. चंद्रशेखर आजाद यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर त्यांनी या स्मारकात असलेल्या चंद्रशेखर आजाद यांच्या जीवनावरील चित्र व छायाचित्र प्रदर्शनला भेट दिली.

हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळ स्मारकाच्या या भेटीच्या वेळी मध्यप्रदेश वनविकास महामंडळाचे अध्यक्ष माधोसिंग डावर यांच्यासह अलिराजपूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात योग तज्ज्ञ सानिका बाम यांची मुलाखत

Tue Jun 20 , 2023
मुंबई :- आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिवस हे दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरे केले जातात. माणसाला तणावमुक्त राहण्यासाठी योग आणि संगीत खूप फायदेशीर ठरते. या दिनानिमित्त योग तज्ज्ञ सानिका बाम यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. योग तज्ज्ञ सानिका बाम यांनी योग दिनाचा मुख्य उद्देश, योगाचे प्रकार, संगीत थेरपी अशा महत्त्वपूर्ण विषयावर ‘जय महाराष्ट्र’ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com