राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘ट्राय सर्व्हिसेस वेटरन्स डे’ चा शुभारंभ

मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांनी निळा झेंडा दाखवून ‘ट्राय सर्व्हिसेस वेटरन्स डे’ चा शुभारंभ नरिमन पॉइंट येथे केला. त्यानंतर नरिमन पॉइंट येथे रोड शो करण्यात आला त्यामध्येही राज्यपाल सहभागी झाले. यावेळी ‘भारत माता की जय’ या घोषणांनी हा परिसर दुमदुमला.

लष्कर, नौदल व वायुदल या तीनही दलातील सैन्यातील अधिकाऱ्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय कार्याची आठवण करून देवून,या शूरवीरांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी ‘ट्राय सर्व्हिसेस वेटरन्स डे’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवगळ्या दिवशी साजरा केला जातो.

नेव्ही फाउंडेशनचे अध्यक्ष कर्नल विजय वढेरा,सचिव कर्नल राज दत्ता,अर्जुन पुरस्कार प्राप्त लेफ्टनंट कर्नल फारोख तारापोर, लेफ्टनंट कर्नल गोपाल सिंग (वय वर्ष 93), नेव्ही फाउंडेशनचे माजी अध्यक्ष कॅप्टन राज मोहिंद्र- (वय 90 वर्षे), कारगिल युद्धानंतर ऑपरेशन मध्ये दिव्यांगत्व प्राप्त झालेले नाईक दीपचंद यासह लष्कर, नौदल व वायुदल या तीनही दलातील आजी आणि माजी अधिकारी यांचे कुटुंबीय देखील यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor presents the 17th ICAI Awards

Sun Jan 7 , 2024
Nagpur :- The Governor of Maharashtra Ramesh Bais presented the 17th ICAI Awards, instituted by the Institute of Chartered Accountants of India in Mumbai. Kumar Mangalam Birla, Chairman of Aditya Birla Group was felicitated with the CA Hall of fame award. The Institute of Chartered Accountants of India (ICAI), through its Committee for Members in Industry & Business (CMI&B) had […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com