रेती चोरून दहा चाकी टिप्पर ट्रकने वाहतुक करताना पकडले

संदीप कांबळे, कामठी

कन्हान पोलीसानी टिप्पर ट्रक व ४ ब्रॉस रेती असा १२,१६००० रूपयांचा मुद्देमाल जप्त.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस १२ कि मी अंतरावरील मौजा नरसाळा शिवारातील नरसाळा ते गांगनेर रोड वर अवैध रित्या रेती चोरून दहा चाकी टिप्पर ट्रकने वाहतुक करतांना मिळुन आल्याने कन्हा न पोलीसांनी दोन आरोपी ला पकडुन त्यांच्या ताब्या तील एकुण १२,१६,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करित पोस्टे कन्हान ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.६) मे ला पहाटे सकाळी ३:३० ते ४ वाजता दरम्यान कन्हान पोलीस च्या महिला पोलीस उप निरिक्षक पल्लवी काकडे हया पोलीस सहकार्या सह रात्री पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहीतीने नाकाबंदी करून शिव प्रसाद शोभेलाल लिल्हारे वय २३ वर्ष राह.खोब्राबड्डी चोखाळा पोस्ट नगरधन ता. रामटेक यांचे ताब्यातील अशोक लेलैंड कंपनीचे दहा चाकी टिप्पर थांबवुन सदर टिप्पर मध्ये असलेल्या रेती बाबत त्यास परवाना विचारला असता त्याच्या कडे कोणता ही परवाना नसल्याचे सांगुन सदर रेती ही प्रविण भारद्वाज राह. हिवरा नगरधन ता. रामटेक यांचे सांगण्या वरून दहा चाकी टिप्पर मध्ये अवैद्य चोरीची रेती भरून वाहतुक करित असल्याचे सांगिल्याने आरोपी च्या ताब्यातुन अशोक लेलैंड कंपनीचे दहा चाकी टिप्पर ट्रक क्रमांक एम एच ४० ए के २०१२ किंमत अंदाजे १२ लाख रूप ये व टिप्पर मधील चार ब्रास रेती किंमत १६ हजार रूपये असा एकुण १२,१६,००० रुपयाचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करून सदर आरोपी शिवप्रसाद शोभेलाल लिल्हारे हा प्रविण भारद्वाज यांचे सांगण्या वरून टिप्पर मध्ये विनापरवाना अवैध रित्या चोरीची रेती वाहतुक करतांना मिळुन आल्याने कन्हान पोली सांनी सरकार तर्फे फिर्यादी पोशि निसार शेख यांच्या तक्रारी वरून आरोपी शिवप्रसाद शोभेलाल लिल्हारे व प्रविण भारव्दाज यांच्या विरुद्ध अप क्र ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com