‘अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल’, उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीत भाजपवर घणाघात

रत्नागिरी :-शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीत जाहीर सभा पार पडली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंची रत्नागिरीत सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. “कोकणामध्ये प्रचार करायची गरज आहे का? मग थांबू इकडेच? मी मुद्दाम आलो. कारण मला कल्पना आहे, कोकण हे शिवसेना आणि आम्हा ठाकरे कुटुंबियांचं हृदय आहे. विनायक राऊत आहेत, भास्कर जाधव आहेत, वैभव नाईक, राजन विचारे आहेत, तुम्ही सगळे जण आहात. मला तुमचा अभिमान आहे. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण तुम्ही जागच्या जागी उभे आहात. हा डाव कसा आहे ते बघा. एकतर शिवसेना फोडली, शिवसेना चोरली, गद्दाराकडे धनुष्यबाण दिलं. गद्दारीची पूर्ण तंगडदोड केली, जागा कापल्या. उमेदवार बदलले”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

‘आता त्या छातीमधील हवा गेली’

“सध्या आयपीएलचे दिवस सुरु आहेत. मॅच बघताना, पंचायत होते की, हा खेळाडू आपल्याकडे होता, तर नाही तो तिकडे गेला. अरे तो तिकडे होता, नाही तो आता तिकडे गेला. तसं आता भारताच्या राजकारणात झाला. आयपीएलमध्ये इनडीयन पॉलिटीकल लीग असंच झालं आहे. मोदी काहीही बोलतील, पण त्यांना आधी 2019 आणि 2014 चा आत्मविश्वास दिसत नाही. आपण फसलो होतोच. मोदींचा आधी काय रुबाब होता? कारण शिवसेना सोबत होती. त्यांचं एक वाक्य होतं, एक अकेला सबपे भारी. अशी मस्ती होती. छाती छप्पन इंचाची होती. आता त्या छातीमधील हवा गेली. एक अकेला सब पे भारी आणि आजूबाजूला सब भ्रष्टाचारी”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

‘अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल’

“अटलजींचा आत्मा वरुन रडत असेल. ते बोलले होते की, अशी सत्ता मला मिळत असेल तर मी चिमटीतही पकडणार नाही. आता अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल. नाकार्तांच्या हातामध्ये भाजप पक्ष गेला आणि भाजप पक्ष संपवून टाकला. अरे शिवसेना आख्खी तुमच्यासोबत होती तेव्हा मोदी आणि शाह यांना महाराष्ट्रात कितीवेळा यावं लागलं होतं? कारण आख्खी शिवसेना त्यांच्यासोबत होती”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोदींच्या सभास्थळी सुशिक्षित बेरोजगाराने लावले फ्लेक्स; म्हणाला, “युवकांचा आक्रोश तुम्हाला…”

Mon Apr 29 , 2024
पुणे :- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रचार सभा, रॅलीचे आयोजन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा एकच धडाका लावल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर पुण्यातील वानवडी येथील रेस कोर्स मैदानावर पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाविजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com