गौतम नगरचा फ़िल्टर प्लांट दुसरीकडे स्थानांतर करा मुख्याधिकाऱ्यानां निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येथील गौतम नगर भागातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध पुतळा परिसरात नगर परिषदद्वारे प्रस्तावित असलेला आर ओ प्लांट दुसरीकडे स्थलांतरीत करावा अश्या मागणीचे निवेदन भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना आज दुपारी सोपविले, निवेदनावर जवळपास 40 स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

गौतम नगरात विविध धार्मिक,सामाजिक आणि इतर कार्यक्रम घेण्यासाठी ही एकमेव जागा आहे, आर ओ प्लांट उभारल्यास जागा राहणार नाही शिवाय दोन आर ओ प्लांट देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडले आहेत याकडे उज्वल रायबोले यांनी मुख्याधिकारी बोरकर यांचे लक्ष वेधले

शिष्टमंडळात भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले तसेच अविनाश गजभिये, माधुरी गजबे,ज्योती नागदेवे, अश्विन बावनगड़े, सुबोध चांदोरकर,गणेश डांगे,छाया वानखेड़े, भारती मेश्राम यांचा समावेश होता

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी विभागात 2 हजार 600 हेक्टर जमीन उपलब्ध  – विभागीय आयुक्त बिदरी

Fri Jul 21 , 2023
Ø शेतकऱ्यांना मिळणार मागणीप्रमाणे वीजपुरवठा Ø शेतकऱ्यांना जमीनीच्या मोबदल्यामुळे शाश्वत उत्पन्न Ø नागपूर विभागात योजनेला गती नागपूर :- शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मागणीप्रमाणे दिवसा वीज उपलब्ध करुन देणाऱ्या महत्वाकांशी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला नागपूर विभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागात आतापर्यंत 185 उपकेंद्रासाठी शासकीय व खाजगी अशी एकूण 2 हजार 596 एकर जमीन उपलब्ध झाली आहे. या योजनेमुळे कृषी पंपांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com