मांडोदेवी चे दर्शन करुन परत येताना पहाटे पहाटे झाला अपघात

अमरदिप बडगे,प्रतिनिधी

4 ते 5 युवक गंभीर जखमी

जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

गोंदिया :- सध्या नवरात्री उत्सव सुरू असून देवी दर्शनाला भक्त मोठ्या प्रमाणत जात असतात, गोंदिया येथील गोविंदपूर परिसरातील १० ते १२ युवक गोंदिया वरून ३५ किलो मिटर अंतरावर असलेल्या मांडोदेवी येथील देवी दर्शना साठी टाटा एस (माल वाहक) या गाडी ने हे युवक रात्री च्या वेळेस गेले. असून दर्शन करून घरी परत येत असताना, गोंदिया येथील पॉलिटेक्निक कॉलेज समोरील दुभाजक असलेल्या विद्युत खांबाला गाडी ने धडक दिली. असुन या अपघातात धडक इतकी जोरदार होती कि विद्युत खांब तुटलेला आहे, तर या अपघात ४ ते ५ युवक गंभीर रित्या जखमी झाले. असून त्यांच्या वर गोंदिया येथील सामान्य शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com