यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारात कामठी पंचायत समितीचा गौरव

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यातील उत्कृष्ट योगदानासाठी कामठी पंचायत समितीला राज्य शासनाच्या 2022-23च्या यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार अंतर्गत विभाग स्तरीय पुरस्कारात कामठी पंचायत समितीने दुसरा क्रमांक पटकावला आहे तर वर्ष 2020-21च्या पुरस्कारात विभागातुन कामठी पंचायत समितीला तिसरा क्रमांक प्राप्त झाल्याने आज पाच फेब्रुवारी ला नागपूर येथील वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वणामती)येथे विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते कामठी पंचायत समितीला अनुक्रमे 8 लक्ष व 6 लक्ष रुपये चे पुरस्कार पारितोषिक देऊन गौरविन्यात आले.

याप्रसंगी कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशा  चनकापुरे,उपसभापती दिलीप वंजारी,गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले,सहाय्यक गट विकास अधिकारी पंकज लोखंडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुजितकुमार अढाऊ,कनिष्ठ प्रशासन अधिकारी अक्षयकुमार मंगरुळकर,विस्तार अधिकारी प्रवीण गावंडे,वरिष्ठ सहाय्यक संजय साखरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील 58 हजार 584 कुटुंबाचे सर्वेक्षण

Mon Feb 5 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने शासकीय आदेशानुसार कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात शुक्रवार 2 फेब्रुवारी पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले ज्यामध्ये कामठी तालुक्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण करीत नागरिकांचे जातिनिहाय सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार कामठी तालुक्यातील एकूण 58 हजार 584 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. कामठी तालुक्यात एकूण 78 गावे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com