भंडारा शहरातील संपुर्ण चौकातील ट्रापिक सिग्नल सुरू करण्यात यावे ; ओबीसी क्रांती मोर्चाची मागणी

भंडारा :- शहरातील संपूर्ण चौकातील ट्रापिक सिग्नल लावण्यात आलेले असून आता पर्यत संपूर्ण सिग्नल सुरू करण्यात आलेले नाही तरी सुद्धा भंडारा शहरातील ट्रापिक सिग्नल सुरू करण्यात यावे आणि शहरातील होणारे अपघात टाळावे अन्यथा असे न केल्यास ओबीसी क्रांती मोर्चा भंडाराच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल म्हणून शहरातील मुख्य चौका चौकातील ट्रापिक सिग्नल सुरू करण्यात यावे अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चा भंडाराच्या वतीने करण्यात आली आहे.  तत्कालीन नगर परिषदमध्ये असलेल्या सरकारने 2021 मध्ये 58 लाख रुपये खर्च करून चौका चौकात सिग्नल लावले होते 2021 पासून अद्यापही सिग्नल सुरू झालेले नाही.दररोज चौकात सिग्नल किव्हा ट्रापिक पोलिस राहत नसल्यामुळे अपघात घडून येत असतात.मागील तीन ते चार महिन्यात अगोदरच एक पोलिस शिपाई राजीव गांधी चौक येथे अपघात झाल्याने निधन झाले होते.आणि शहराच्या प्रत्येक चौकात वाहतुकीची कोंडी होत असते व दररोज किरकोळ अपघात होत असतात.आपण भंडारा जिल्हाधिकारी म्हणून रुजू होताच अवघ्या आठ ते पंधरा दिवसात शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकातील सिग्नल सुरू झाले परंतु कधी सुरू तर कधी बंद असतात त्यामुळे प्रवासाच्या दरम्यान नागरिकांची कोंढि होत असते.त्यामुळे आपल्याकडून अपेक्षा आहे की भंडारा शहरातील चौका चौकातील संपूर्ण ट्रापिक सिग्नल सुरू करण्यात यावे अन्यथा नाईलाजासत्व ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलणाचा प्रवित्रा स्वीकारावा लागेल अश्या निवेदन मा.जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर,पोलीस वाहतुक निरीक्षक भंडारा शिवाजी कदम,नगर परिषद प्रशासक वसंत जाधव यांना सोपविण्यात आले आहे.या प्रसंगी ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संजय मते,संयोजक जीवन भजनकर,संयोजिका शोभा बावनकर, सुधीर सर्वे, नेहाल बावणे, गणेश सार्वे, राकेश बावणे,निशाण तितरमारे,पुणेस्वर विस्मकर्म, विकास विश्वकर्मा,मुकेश सार्वे, अंकित रामटेके, अश्विन घरडे,कामेस लेंडे,विद्या मदनकर,गीता तूरस्कार,रोहिणी आसवले,सुरज मोटघरे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

16 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

Thu Jan 12 , 2023
गडचिरोली : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी /अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवून करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनासाठी शासनाने महिला लोकशाही दिवस साजरा करणेकरीता सुचित केले आहे.त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येते. दिनांक 16 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com