– ३० सप्टेंबर पर्यंत एका बाजूची वाहतूक बंद
नागपूर :- नागपूर महानगरपालिकाद्वारे माऊंट रोड, साळवे चौक ते आकाशवाणी चौक ते महाराजबाग चौक पर्यंत सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित केले आहे. या कामाकरिता माऊंट रोड, साळवे चौक ते आकाशवाणी चौक ते महाराजबाग चौक पर्यंत रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. हे आदेश येत्या ३० सप्टेंबर पर्यंत अमलांत राहील, असे आदेशात नमूद केले आहे.
माऊंट रोड, साळवे चौक ते आकाशवाणी चौक ते महाराजबाग चौक पर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक डाव्या बाजूने दुतर्फा व वळती रस्त्यांवरून वळविण्यात येणार आहे. तसेच उजव्या बाजुकडील रस्ता कोणत्याही वाहतुकीस बंद करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे.
आदेशात नमूद केले आहे की, रात्रीचे वेळी वाहनचालकांना माहितीकरीता एलईडी डाव्हर्सन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरीगेटींगवर एलएडी माळा लावणे आवश्यक आहे. उजव्या बाजुचे दुतर्फा वाहतुक चालणार आहे त्या ठिकाणी अस्थाई रस्ते दुभाजक तयार करुन एकाच मार्गावरुन दुतर्फा वाहतुक वळविण्यात यावी. अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतुक नियमांचे तसेच वाहतुक पोलिसांनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांचे सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य उपलब्ध करुन घ्यावी. असेही आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.