नागपुर – १४ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीसाठी माध्यम प्रतिनिधीची व्यवस्था छत्रपती हॉलमध्ये करण्यात आली आहे. फक्त निवडणूक आयोगाकडून प्रवेशिका मिळालेल्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रवेश मिळणार आहे. प्रवेशद्वारावर आपली यादी दिली आहे. आपल्याजवळील हिरव्या रंगाची प्रवेशिका दाखवून आपल्याला प्रवेश मिळेल. या ठिकाणी बैठक व्यवस्था, संगणक सुविधा व खानपानाची व्यवस्था केली आहे. मतमोजणीची प्रत्यक्ष प्रक्रिया ८ वाजता सुरू होईल. माध्यम कक्षात आपले मोबाईल वापरता येईल. मात्र मतमोजणी केंद्राच्या फेरीदरम्यान मोबाईल वापरता येणार नाही.(या ठिकाणी व्हीडीओ कॅमेरा, स्टील कॅमेरा वापरता येईल. मोबाईल नाही ) पाच – पाचच्या पथकाला मतमोजणी केंद्राची पाहणी करता येईल. त्या काळात मतमोजणी केंद्रावरील माहिती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या नियमित ग्रुपवर टाकली जाणार आहे. कृपया सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.