आज विकास ठाकरे पिंजून काढणार दक्षिण नागपूर; इंडिया आघाडीच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात

नागपूर :- देशात वाढती बेरोजगारी, महागाई, सत्ताधाऱ्यांकडून संवैधानिक केंद्रीय संस्थांचा गैरवापर याला सामान्य नागरिक कंटाळला आहे. सामान्यांची आवाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी आमदार विकास ठाकरे आज (ता. १ एप्रिल २०२४) रोजी सकाळी ८ वाजता पासून दक्षिण नागपूर पिंजून काढणार आहे. त्यांच्या सोबत इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांचीही उपस्थिती राहील.

इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी रविवारी शहरातील विविध भागात पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेतली. प्रत्येक बैठकीत मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. नागरिकांकडून त्यांना उदंड प्रतिसाद लाभत असून जनताच लबाडांना धडा शिकवणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

सूतकताईमध्ये रमले ठाकरे – गुडधे

महात्मा गांधी यांच्या विचारांमध्ये वेगळी उर्जा असून त्यात रमलेल्या व्यक्तीला कधीही थकवा येत नाही. असाच अनुभव लोकसभा निवडणूकीच्या धावपळीत इंडिया आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे आणि माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांना आला. रविवारी सकाळी त्रिमूर्तीनगरातील राजीव गांधी उद्यान येथे सुरु असलेल्या सत्यशोधक चरखा संघाला भेट दिली. यावेळी दोघेही सूतकताईमध्ये रमले होते.

संविधान वाचविण्यासाठी रिपब्लिकन संयुक्त आघाडीही सोबतीला

इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांना रिपब्लिकन संयुक्त आघाडीनेही समर्थन जाहीर केले असून यापूर्वी वंचित बहुजन आघाडीनेही ठाकरेंना समर्थन जाहीर केले होते. त्यामुळे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी थेट लढत होणार असल्याचे रिपब्लिकन संयुक्त आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.

जन आशीर्वाद यात्रेचा मार्ग

जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात राजाबाक्षा हनुमान मंदिर येथे माल्यार्पण करुन ऑरियस हॉस्पिटलच्या मागील भाग- वंजारी नगर-दर्गा परिसर-रेल्वे ग्राऊंड पेट्रोल पंप- कुकडे लेआऊट परिसर- न्यू एपोस्टेलिक शाळेचा परिसर-जोशी वाडीच्या मागील परिसर-मानवता शाळा चौक-कुंजीलाल पेठ परिसर-बाबुलखेडा परिसर-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन सिमेंट रोडने डावीकडे बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोरुन- जीवन मेडिकल चौककडून सरळ साईनाथ शाळा रोड-डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज समोरुन प्रगती नगर रोड ते उजवीकडे वळून सरळ लेबर ठिय्या चौक-मानेवाडा रोड डावीकडे वळून कुदरत पान मंदिर-ज्ञानेश्वर नगर गेट समोरुन सिद्धेश्वर सभागृह चौक- उजवीकडे वळून शारदा चौक जवाहर नगर परिसर-पोलीस क्वॉर्टर – बाल हनुमान मंदिर चौक- उजवीकडून वळून महाकाळकर बिल्डिंग-उजवीकडे वळून सुधांशू सभागृह-सुर्वे लेआऊट-सोनझरी नगर महाकाळकर सभागृह-बीडीपेठ परिसर-आशीर्वाद नगर परिसर-राजलक्ष्मी सभागृह येथे यात्रा थांबेल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हाईकोर्ट का नया रोस्टर आज से

Mon Apr 1 , 2024
नागपुर :- बॉम्बे हाई कोर्ट की नागपुर बेंच का रोस्टर सोमवार 1 अप्रैल से बदल दिया गया है. नागपुर पीठ के प्रशासनिक न्यायाधीश नितिन सांबरे और न्यायमूर्ति अभय मंत्री सभी जनहित याचिकाओं की सुनवाई कर रहे हैं। साथ ही, दोनों न्यायाधीश उसी वर्ष की सिविल रिट याचिकाओं, नागपुर पीठ के अधिकार क्षेत्र में आने वाली सिविल याचिकाओं, वाणिज्यिक अदालत की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com