नागपूर :- बहुजन समाज पार्टीच्या कही हम भूल न जाये या अभियानांतर्गत पुरोगामी विचारांचे प्रणेते, अस्पृश्यो धारक, स्त्रीउद्धारक, जातपात भंजक, समता उपदेशक, दक्षिणेचा प्रबुद्ध, महात्मा बसवेश्वर (बसवंण्णा) ह्यांची उद्या 892 वी जयंती.
नागपूर जिल्हा व शहर बसपाच्या वतीने शनिवार दिनांक 22 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता दक्षिण नागपुरच्या सुभेदार ले-आउट येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल.
बसपाच्या प्रदेश, जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर, वार्ड व बूथ स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मा मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.