आज दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)..

मुंबई – जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय. राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार.

(मृद व जलसंधारण विभाग)

जळगांव जिल्ह्यातील कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देणार. २२२६ कोटी सुधारित खर्चास मान्यता.

(जलसंपदा विभाग) 

आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार

(आदिवासी विभाग)

खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड.

राज्यातील ग्रामीण भागात सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणार.

(रोजगार हमी योजना)

गगनबावडा आणि जत तालुक्यात मौजे संख येथे होणार ग्राम न्यायालय

(विधि व न्याय विभाग)

शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना. नाममात्र नोंदणी व मुद्रांक शुल्क आकारणारा

(महसूल विभाग)

राज्यात काजू फळपिक विकास योजना लागू होणार. कोकणातील शेतकऱ्यांना होणार फायदा.

(कृषि विभाग)

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ. वाचनसंस्कृतीला मिळणार बळ.

(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करणार. कालबाह्य तरतुदी काढणार. कारावासाऐवजी वाढीव दंडाची तरतूद

(कामगार विभाग)

१३ सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासनाने बँकेस देय असलेली रक्कम अदा करणार.

(सहकार विभाग)

पुणे जिल्ह्यातील आंबेगांव बु. येथील शिवसृष्टी प्रकल्पास ५० कोटी अनुदान देणार.

(पर्यटन विभाग)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार

(सामान्य प्रशासन विभाग)

पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, कर्जत या स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठांना मान्यता

(उच्च व तंत्रशिक्षण )

महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा अधिनियमात शिक्षेच्या सुधारित तरतुदी. ईज ऑफ डुईंग बिझिनेसाठी निर्गुन्हेगारीकरण करणार

(गृह विभाग )

राज्यातील शाळांना अनुदान. ११०० कोटींना मान्यता

(शालेय शिक्षण)

महाअधिवक्ता श्री आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत.

(विधी व न्याय)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आपत्ती व्यवस्थापनातून सेवा करण्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे आवाहन

Tue Dec 13 , 2022
जिल्हयात आपत्ती व्यवस्थापनासाठी 300 आपदा-मित्रांची जोड, प्रशिक्षणास सुरूवात गडचिरोली :- प्रशासन तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात आपत्तीच्या स्थितीत मदत करतात. कोणताही प्रकारचा स्वहेतू किंवा प्रसिद्धी दूर ठेवून पूरस्थितीत लोकांचे जीव वाचविले जातात. त्याचप्रकारे तुम्ही आपदा-मित्र म्हणून काम करताना स्वहेतू मनात न ठेवता काम करावे. यातूनच खऱ्या अर्थाने सेवा होत असते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com