राज्यपालांकडे विधानपरिषद सदस्यांसाठी मंजुरीसाठी पाठविलेल्या 12 जणांची यादी देण्यास शासनाचा नकार!

मुंबई – एकीकडे राजभवन येथील राज्यपालाचे सचिवालय विधानपरिषद सदस्यांसाठी प्राप्त 12 जणांची यादी देत नाही तर दुसरीकडे ज्या महाराष्ट्र शासनाने राज्यपालांकडे विधानपरिषद सदस्यांसाठी 12 जणांची यादी मंजुरीसाठी पाठविलेली आहे ते ही यादी सहित माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस आता देण्यास तयार नाही.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली हे कित्येक महिन्यापासून त्या यादीची मागणी करत आहे. परंतु दुर्दैवाने यादी देण्यास ना राज्यपाल सचिवालय तयार आहे ना महाराष्ट्र शासन. अनिल गलगली यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल नामित 12 विधानपरिषद सदस्यांसाठी मंजूर करण्यात आलेला प्रस्ताव आणि ठरावाची माहिती मागितली होती. मुख्य सचिव कार्यालयाने गलगली यांचा अर्ज संसदीय कार्य विभागाकडे हस्तांतरित केला. या विभागाचे कक्ष अधिकारी टी. एन. शिखरामे यांनी अनिल गलगली यांस कळविले की अद्यापही प्रकरण पूर्ण व समाप्त झाले नसल्याने ही माहिती कलम 8(1) अनुसार उपलब्ध करुन देता येत नाही.

अनिल गलगली यांच्या मते विधानपरिषद सदस्य नेमणूक आणि पाठविलेल्या यादी बाबत दोन्हीकडून टाळाटाळ केली जात आहे. महाराष्ट्र शासनाने प्रामाणिकपणे ही यादी जनतेस उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यामुळे नेमकी अडचण काय आहे? याचा खुलासा होईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कोविड नियमांचे उल्लंघन : शोध पथकाची कारवाई

Fri Jan 28 , 2022
नागपूर, ता. २८ :   नागपूर महानगरपालिके तर्फे शुक्रवारी (२८ जानेवारी) रोजी ६ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ७० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने धंतोली झोन अंतर्गत एम्प्रेस मॉल येथील नकक्षत्र बंकीत यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु २५,००० च्या दंड वसूल केला. त्याचप्रमाणे गांधीबाग झोन अंतर्गत गंजीपेठ बजेरिया येथील पांडुरंग जगरे यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!