गुरुवारी जिल्ह्यात शून्य कोरोना पॉझिटिव्ह

  • रुग्ण डिस्चार्ज 00
  • एकूण डिस्चार्ज 58972
  • एकूण पॉझिटिव्ह 60106
  • क्रियाशील रुग्ण 01
  • आज मृत्यू शून्य
  • एकूण मृत्यू 1133
  • रिकव्हरी रेट 98.11 टक्के
  • मृत्यू दर 01.89
  • आजच्या टेस्ट 461
  • एकूण टेस्ट 476304

भंडारा : जिल्ह्यात गुरुवारी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.2) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. गुरुवारी 461 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता एक सक्रिय रुग्ण आहे.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58972 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60106 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 76 हजार 304 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60106 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

  • कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असून पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस अवश्य घ्यावी.
  • जे लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी पात्र ठरले आहेत,त्यांनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा.
  • सध्या सणासुदीचे दिवस आहेत आवश्यकता नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
  • कोविडवर्तणूक नियमावलीचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

मनपा विद्यार्थ्यांसाठी 'संगणक शिक्षण बस'चा शुभारंभ एलकेम कंपनी आणि सह्याद्री फाउंडेशनच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचे स्वप्न होणार साकार

Fri Dec 3 , 2021
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण घेता यावे यासाठी त्यात संगणकाची उपलब्धता ही बाब अडसर ठरत होती. मनपाच्या शाळेत येणा-या गरीब, गरजू विद्यार्थ्यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. एलकेम कंपनीद्वारे सी.एस.आर. निधीमधून आणि सह्याद्री फाउंडेशनच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेला एक बस देण्यात आली असून त्यामध्ये संगणक शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. या बसचे गुरूवारी (ता.२) मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, एलकेम कंपनीचे प्रबंध निदेशक अय्यर श्रीनिवासन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com