नवीन अभ्यासिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण होईल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई :-  मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूरक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या रोजच्या प्रशिक्षण वेळेनंतर संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. यू. पी. एस. सी.आणि एम. पी. एस. सी. तसेच स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, १०वी आणि १२ वी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा याचा लाभ घेता येईल. मुले व मुलींकरिता स्वतंत्र वर्ग खोल्या उपलब्ध करुन देण्यात येतील. यामध्ये पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह व इतर सुविधा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत असेही मंत्री लोढा म्हणाले.

यावेळी मंत्री लोढा यांच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये कौशल्य विकास विभाग, महिला बाल विकास विभाग, पर्यटन विभाग आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचा आढावा ‘स्वयंसेवक ते जनसेवक’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रत्येक मनाला शिकवण देईल तोच विश्वगुरू - पूज्यपाद स्वामी पितांबरानंद यांचे प्रतिपादन

Tue Sep 12 , 2023
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राष्ट्रसंत व्याख्यानमाला नागपूर :- विश्वरूप म्हणजे संपूर्ण जगाला एकच शिकवण देणे नव्हे. या जगात अनेक व्यक्तींची अनंत मने आहेत. त्या प्रत्येक मनाला शिकवण देईल तोच विश्वगुरू आहे, असे प्रतिपादन रामकृष्ण संघ बेलूर मठ येथील वरिष्ठ संन्यासी पूज्यपाद स्वामी पितांबरानंद यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शताब्दी पर्व निमित्त राष्ट्रसंत व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!