मौदा :- दिनांक २४/०५/२०२३ चे ०७/०० वा. ते १०/०० वा. दरम्यान यातील फिर्यादी आपल्या शेतात कामाला गेले तेव्हा फिर्यादीची मुलगी व पत्नी व चुलत बहिण घरी हजर होते. फिर्यादी शेतातून घरी परत आले असता त्यांची मुलगी हि घरून निघून गेली नातेवाईकांकडे शोध घेतला मिळुन आली नाही कोणीतरी अज्ञात आरोपीने तिला फुस लावुन पळवून नेले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन मौदा येथे आरोपीविरुद्ध कलम ३६३ भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नायक निशांत मेश्राम व नं. १०१६ हे करीत आहे.