कामठी तालुक्यात तीन दिवसीय प्रशिक्षण व अभ्यास दौरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- यशवंतराव चव्हाण विकास प्रकाशन प्रबोधिनी यशदा पुणे यांच्यावतीने नुकत्याच निवडणुका पार पाडून पदभार सांभाळणाऱ्या नवनियुक्त ग्रा प सरपंच,उपसरपंच व ग्रा प सदस्य यांचे 9 ते 11 फेब्रुवारी या तीन दिवसीय क्रांती ज्योती प्रशिक्षण कामठी पंचायत समिती सभागृहात घेण्यात आले.

या दरम्यान ग्राम स्वराज्य अभियान पंचायत राज प्रशिक्षण केंद्र नागपूर यांचा आदर्श ग्राम पदाधिकारी क्षेत्रीय दौरा कामठी तालुक्यातील कढोली गावाला भेट दिली.या संपूर्ण आदर्श ग्राम पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्या नंतर आपल्या अभ्यासातून व कल्पकतेतून कढोली ग्रा प च्या माजी सरपंच प्रांजल वाघ ,ग्रामसेवक ब्रह्मानंद खडसे ,उपसरपंच व समस्त ग्रा प सदस्य यांच्या सहकार्याने निर्मित केलेले आदर्श पुरस्कारीत गाव व गावात केलेली लोकोपयोगी कामे,तसेच गावातील सर्वांचे मिळत असलेले सहकार्य याबाबत सविस्तर माहिती घेतली.तसेच या तीन दिवसीय प्रशिक्षनात कामठी पंचायत समिती येथे राबविण्यात येत असलेले उपक्रम,ग्रामपंचायत कामकाज,नियम,कर्तव्य,जवाबदाऱ्या,शासकीय योजना,निधी याविषयी माहिती दिली.तीन दिवस चाललेल्या या संपूर्ण प्रशिक्षणाला यशदा चे प्रवीण प्रशिक्षक उद्धव साबळे,प्रवीण प्रशिक्षक नीता पोटफोडे,प्रवीण प्रशिक्षक प्रांजल राजेश वाघ,प्राचार्य अभय बन्सोड यांनी प्रशिक्षण दिले तसेच कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशाताई चनकापुरे ,उपसभापती दिलीप वंजारी व बीडीओ अंशुजा गराटे यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समाजकल्याण विभागाचा अन्याय कामठीतील गटई कामगारांना अद्याप स्टॉल वितरण नाही भाजपचे समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्ताना निवेदन

Mon Feb 13 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येथील जवळपास 18 चर्मकार कामगारांना 4 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा गटई कामगार चे स्टॉल समाजकल्याण विभागाने वितरण न केल्याने कामगारात असंतोष आहे. भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांना नुकतेच निवेदन देऊन चर्मकार बांधवाना न्याय देण्याची मागणी केली. शिष्टमंडळात भाजपा महामंत्री उज्ज्वल रायबोले, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com