कन्हान येथे तीन दिवसीय ‘ भीम – महोत्सव ‘

कन्हान :- रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या वतीने तीन दिवसीय भीम महोत्सवाचे आयोजन ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे करण्यात आले आहे .

शुक्रवार दिनांक 17 नोव्हेबर 2023 रोजी सकाळी 8 : 00 वाजता धम्म प्रभात रैली व सायंकाळी 6 : 00 वाजता भीमगीत व प्रबोधनात्मक आर्केस्ट्रा व शनिवार 18 नोव्हेबर 2023 रोजी प्रबोधनकार अशोक सरस्वती यांचे ऐतिहासिक आंबेडकरी प्रबोधन कार्यक्रम तसेच रविवार 19 नोव्हेबर 2023 रोजी सकाळी 8 : 00 वाजता शासकीय योजनेची माहिती व ‘ रामटेक क्षेत्राची दशा व दिशा ‘ या विषयावर व्याख्यान व सायंकाळी 6 : 00 वाजता महाराष्ट्राचे ख्यातनाम कव्वाल प्रकाशजी पाटणकर यांचे शिष्य लोखंडे यांचे कव्वालीमय आंबेडकरी प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे

रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी प्रसिद्विपत्रकात माहिती दिली असून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याची अपील केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गणेशपुरला पशुपक्षी प्रदर्शनी व पशुपालक मेळावा 

Fri Nov 17 , 2023
भंडारा :-  पशुसंवर्धन विभाग पंचायत समिति भंडारा तर्फे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी व पशुपालक मेळाव्याचे आयोजन उद्या विठ्ठल रुक्माई मंदिर जवळ कोरंभी रोड गणेशपुर येथे सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या मेळाव्यात पशुपालना विषयी तज्ञाद्वारे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील उत्कृष्ट जनावरांना गट निहाय बक्षिष देण्यात येणार आहे. मेळाव्याला जास्तीत जास्त पशुपालकानी स्वतः च्या उत्कृष्ट पशु-पक्ष्यासह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com