कराटेमध्ये सौम्य, आर्याला सुवर्णपदक : खासदार क्रीडा महोत्सव

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कराटे स्पर्धेमध्ये १० वर्षाखालील वयोगटात सौम्य अंबादे आणि आर्या झाडे यांनी सुवर्ण पदक पटकाविले.

विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे मंगळवारी (ता.२३) कराटे स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेमध्ये १० वर्षाखालील वयोगटातील ३२ किलोवरील वजनगटामध्ये मुलांमध्ये सौम्य अंबादेने प्रथम क्रमांक पटकाविला. तर यश उमाठे उपविजेता ठरला. सायन बारई आणि मंडावारकर यांनी तिसरे स्थान पटकावले. मुलींच्या गटामध्ये आर्या झाडे विजेती तर मायरा फातेमा उपविजेती ठरली. एव्हलिन रॉबीन आणि एलिना शेख यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.

१० ते १२ वर्ष वयोगटामधील २४ किलोखालील वजनगटातील मुलांच्या स्पर्धेत देवांश अत्तरगडेने सुवर्ण, आराध्य कांबेने रौप्य आणि सम्यक खोब्रागडे व सोहम खोटेले यांनी कांस्य पदक पटकाविण्याची कामगिरी केली. मुलींच्या स्पर्धेत दिव्यानी यादवने सुवर्ण पदक, ओजस कुलसंगेने रौप्य पदक, किंजल करंडे आणि नंदीनी कुमारने कांस्य पदक पटकाविले.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी स्पर्धेचे कन्वेनर अशफाक शेख, समन्वयक बाल्या ठोंबरे, अक्षय इंगळे, डॉ. झाकीर खान, सुरेंद्र उगले, संजय इंगोले आदी उपस्थित होते. विजेत्यांना खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले.

निकाल (सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक)

१० वर्षाखालील वयोगट : ३२ किलोवरील वजनगट –

मुले: सौम्य अंबादे, यश उमाठे, सायन बारई, विराज मंडावारकर

मुली : आर्या झाडे, मायरा फातेमा, एव्हलिन रॉबीन, एलिना शेख

१० ते १२ वर्ष वयोगट : २४ किलोखालील वजनगट –

मुले : देवांश अत्तरगडे, आराध्य कांबे, सम्यक खोब्रागडे, सोहम खोटेले

मुली : दिव्यानी यादव, ओजस कुलसंगे, किंजल करंडे, नंदीनी कुमार

१० ते १२ वर्ष वयोगट : २४ ते २६ किलो वजनगट –

मुले (अ गट) : अथर्व कडव, लिजीत धकाते, निनाद क्षिरसागर, तक्षक बावनकर

मुले (ब गट) : अर्णव बागडे, बलराज वर्मा, देवांश पौनीकर, मोहम्मद सिबतैन

१० ते १२ वर्ष वयोगट : २८ ते ३० किलो वजनगट –

मुली : स्वरा खरवडे, मनस्वी सोनटक्के, लितीका ठाकुर, कस्तुरी कराळे

१० ते १२ वर्ष वयोगट : ३४ ते ३६ किलो वजनगट –

मुली : एलिना पीटर, हेमलता धार्मीक, त्रिष्णा गावी, वेदांता चौरीया

१० ते १२ वर्ष वयोगट : ३६ किलोवरील वजनगट –

मुली : गार्वी रंगारी, अनाहिता कपूर, रिद्धीमा गिरी, अमिशी पुरोहित

१० वर्षाखालील वयोगट : १६ किलोखालील वजनगट –

मुले : सम्राट बावनकर, विशांत कोंगे, महेंद्र मडावी, शिवाय ग्रोवर

१० वर्षाखालील वयोगट : ३२ किलोवरील वजनगट –

मुले : चैतन्य धुवे, हनी टेकाम, केयान कादार, अर्णव पाटील

१० ते १२ वर्ष वयोगट : २४ किलोखालील वजनगट –

मुले : पुष्कर कुर्वे, आरीश शेख, अनुराह मेश्राम, श्रीनू बेले

NewsToday24x7

Next Post

कॅरम स्पर्धेत मो.इब्राहिम, सन्नी चंद्रीकापुरेची विजयी सुरूवात : खासदार क्रीडा महोत्सव

Wed Jan 24 , 2024
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कॅरम स्पर्धेचे मंगळवारी (ता.२३) उत्तर नागपूर क्रीडा संकुल अहुजा नगर येथे माजी आमदार डॉ. मिलींद माने यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी भोजराज डुंबे, स्पर्धेचे कन्वेनर नागेश सहारे, समन्वयक महेंद्र धनविजय, गणेश कानतोडे, धैर्यशील वाघमारे, मोहम्मद इकबाल, मुकुंद नागपुरकर, शिवनाथ पांडे, अमित पांडे, राजेश हाथीबेड, आकाश जटोले, राजेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com