RBI ला स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी, मेलने उडवली झोप, रशियाशी कनेक्शन; पोलीस झाले अलर्ट

देशभरातील शाळा, एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन्स बॉम्बने उडवण्याची धमकीची प्रकरण सातत्याने वाढत आहेत. या आठवड्यात दिल्लीतल अनेक शाळांना धमकी मिळाली होती. तर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाही (RBI) स्फोटकांनी उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिचती समोर आली आहे. धमकीचा हा ईमेल गुरूवारी दुपारी आरबीआच्या अधिकृत वेबसाईटवर पाठवण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी ही माहिती उघड झाली. रिझर्व्ह बँक उडवून देण्याची धमकी असणारा हा ईमेल रशियन भाषेत होता. याआधीही रिझर्व्ह बँकेला बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. याप्रकरणी माता रमाबाई मार्ग (एमआरए मार्ग) पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणाची गंभीरता पाहता पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. यापूर्वी गेल्या महिन्यातही आरबीआयला धमकी मिळाली होती.

तर या आठवड्यात दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली, तसाच एक मेल आज अर्थात 13 डिसेंबरलाही अनेक शाळांना मिळाला. त्यानंतर विविध सुरक्षा एजन्सीजनी शाळेच्या परिसरात तपासणी करण्यास सुरूवात केली. यापूर्वी दिल्लीतील किमान 44 शाळांना अशाच प्रकारचे ईमेल आले होते. तपासाअंती या धमक्यांना केवळ अफवा असल्याचे पोलिसांनी म्हटले.

सतत वाढत आहेत धमक्या

गेल्या काही महिन्यांत धमकीच्या कॉल्सची संख्या सतत वाढली आहे. कधी शाळेत धमकीचे कॉल येतात तर कधी फ्लाइटमध्ये धमकीचे कॉल मिळत आहेत. विमानं बॉम्बने उडवून देण्याच्या शेकडो धमक्या आत्तापर्यंत मिळाल्या आहेत तसेच काही शाळांनाही अशीच धमकी मिळाली.

Source by tv9 marthi
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जोतीरावांचे विचार विश्वव्यापी - उत्तम कांबळे

Fri Dec 13 , 2024
नागपूर :- १९ व्या शतकात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, स्त्री शिक्षण, प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत, जलव्यवस्थापन महत्वाचे, विधवाश्रम, मुलींसाठी पहिली शाळा, अशा अनेक सामाजिक सुधारणांचे प्रवर्तक युगपुरुष महात्मा जोतीराव फुले आहेत. शाळा स्थापन करुन, ते थांबले नाहीत तर अभ्यासक्रम, शिक्षणपध्दती यावर त्यांचा भर होता. दुष्ट परंपरा-रुढी नाकारुन मानवता प्रदान करणारे त्यांचे अखंड ही काळाची गरज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!