हजारो नागरिकांनी घेतली नायलॉन मांजा मुक्त नागपूरची प्रतिज्ञा

नागपूर :- मी पतंग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही आणि माझ्या परिसरामध्ये कुणालाही नायलॉन मांजाचा वापर करु देणार नाही. या संकल्परुपी प्रतिज्ञेच्या स्वरांनी कविवर्य सुरेश भट सभागृह दुमदुमले. हजारोंच्या संख्येत नागरिकांनी नायलॉन मांजा मुक्त नागपूरची प्रतिज्ञा घेतली.

नायलॉन मांजाने आजपर्यंत शेकडो बळी घेतले अनेकांना जखमी व पक्ष्यांचा सुद्धा बळी घेतला आहे. बंदी असलेल्या नायलॉन मंजावर अमलबजावणी बाबत चर्चा, इकोब्रिक्स प्रशिक्षण व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांबाबत माहिती देण्यासाठी शनिवारी (ता.६) नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेच आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेत नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा, पोलीस उपायुक्त अर्चित चांडक, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, नागपूर@२०२५ चे समन्वयक निमेश सुतारीया, जुही सहस्रबुद्धे यांचासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी, मनपा आणि जिल्हापरिषदेच्या सर्व शाळांचे मुख्यध्यापक, शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी मार्गदर्शनपर सांगितले की, नायलॉन मांजा हा संपूर्ण पर्यावरणासाठी घातक आहे. या नायलॉन मांजामुळे आजपर्यंत शेकडो नागरिकांचा आणि निरपराध पक्ष्यांचा बळी गेला आहे. नागपूरातून नायलॉन मांजाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. समाजात शिक्षकांचे स्थान हे अत्यंत महत्वाचे आहे, शिक्षकांच्या मार्फत थेट घराघरापर्यंत पोहोचल्या जाऊ शकते. शिक्षक हे केवळ एक विद्यार्थी घडवीत नाहीत तर, ते संपूर्ण समाज घडवितात. जर शिक्षकांनी मनावर घेतल्यास समाजात नक्कीच सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थांना नायलॉन मांजाबाबत जागरूक करायला हवे. असे आवाहनही गोयल यांनी केले.

याशिवाय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नागपुरातील विविध उपक्रमांबाबत माहिती देत आंचल गोयल म्हणाल्या की, नागरिक स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नशील आहे. तरी शेकडो टन कचरा दररोज डम्पिंग यार्ड येथे डम्प केला जातो. आपण सर्वांनी विकासिततेकडे वाटचाल करतांना भविष्यात कमीत-कमी कचरा निर्माण होऊल याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे. शिक्षकांनी सांगितलेली बाब ही विद्यार्थी घरी जाऊन घरातीस वरिष्टांना सांगतात. त्यामुळे शिक्षकांचे स्वच्छते बाबत जनजागृती करण्यात विशेष महत्व आहे. मनपा हद्दीतील वार्ड निहाय शाळांमध्ये शिक्षकांनी आपापल्या शाळेत हिरव्या आणि निळ्या रंगाचे दोन डजबीन ठेवायला हवे सुखा आणि ओला कचरा याबाबत विद्यार्थांमार्फत शाळा परिसरात जनजागृती करायला हवी, असे केल्यास आपण देशपातळीवर उपराजधानीची एक सकारत्मक प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी होऊ असेही गोयल यांनी यावेळी सांगितले.

तसेच प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी ‘इकोब्रिक्स’ हा चांगला पर्याय असून, मनपाच्या शाळांमध्ये 6 ते 26 जानेवारी दरम्यान इकोब्रिक्स बाबत जनजागृती व स्पर्धेचे आयोजन केल्या जाणार आहे. विद्यार्थांनी मोठ्यासंखेत स्पर्धेत सहभागी होत शहर सौंदर्यीकरणात हात भर लावावा असे आवाहन ही गोयल यांनी यावेळी केले.

तर नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  सौम्या शर्मा यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नायलॉन मांजा बाबत जनजागृती केली जाणार असल्याचे सांगत. मुख्यध्यापकांनी आपापल्या शाळांमार्फत नायलॉन मांजा आणि शून्य कचरा याबाबत मोठ्याप्रमाणात जनजागृती करायला हवी. तसेच ग्रामीण भागात इकोब्रिक्स हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्हा परिषदेच्या शून्य कचरा संकल्पनेला अंबलात आणून पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून वाचविण्यासाठी प्रयत्न केले जाईल असेही शर्मा यांनी सांगितले. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध उपक्रमात शाळांनी सक्रीय सहभाग नोंदवीत “नास” सर्वेक्षणात प्रथम पाच मध्ये स्थान मिळविण्याचा प्रयत्न करावा असेही आवाहनही शर्मा यांनी उपस्थित मुख्यध्यापकांना केले.

पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी नागपूर पोलीसांना नायलॉन मांजा विक्री संदर्भाची संपूर्ण माहिती असून, पोलीस कारवाई साठी सज्ज असल्याचे सागितले. तसेच चांडक यांनी नायलॉन मांजाची खुल्या बाजारात विक्री न होता तो ऑनलाईन पद्धतीने कसा विकल्या जातो याची माहिती दिली व ऑनलाईन व्रिक्री करणाऱ्या विविध कंपन्यांना पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री बाबत ताकीद देण्यात आले आहे असे सांगितले. तसेच नागरिकांनी देखील आपला क्षणिक आनंदासाठी कुणासाठी तरी जीव घेणा ठरू शकतो याची जाणीव ठेवावी असे सांगत पतंग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर करू नये, नायलॉन मांजाची विक्री होताना दिसत असेल तर त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन केले.

याशिवाय चांडक यांनी सायबर गुन्हापासून स्वतःचा बचाव कसा करायचा, कुणाला ओटीपी देऊ नये, कुठलीही मोबाईल अप्लिकेशन थेट डाऊनलोड करू, त्याची शहानिशा करावी असे ही सांगितले.

मनपाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी नायलॉन मांजा विषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नायलॉन मांजामुळे आजवर शेकडो अपघात झाले आहेत. यात नागरिकांचे आणि निष्पाप पक्षींचे जीव गेले आहे. तसेच नायलॉन मांजा हा विघटीत होत नसल्याचे मानवी जीवनासह पर्यावरणासाठी देखोल घातक असल्याचे सांगत डॉ. महल्ले यांनी नायलॉन मांजा हद्दपार करण्यासाठी प्रयत्न कार्याला हवे. शाळांमार्फत मुलांमध्ये जनजागृती करायला हवी असे सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यशाळेची सुरुवात झाली. कार्यशाळेत मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी नायलॉन मांजा मुक्त नागपूरची प्रतिज्ञा दिली. कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी केले. तर नागपूर@२०२५ चे समन्वयक  निमेश सुतारीया यांनी नागपूर@२०२५ संस्थेने नागपूर महानगरपालिकासह मिळून स्वच्छते संदर्भात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले.

इकोब्रिक्सने शहर सौंदर्यीकरणात पडेल भर

घरारातून निघणारा प्लास्टिक कचरा घरीच कसा कमी करता यावा याबद्दल इकोब्रिक्स प्रशिक्षण कार्यशाळेत जुही सहस्रबुद्धे यांनी मार्गदर्शन केले. इकोब्रिक्सचा वावर केल्यास शहर सौंदर्यीकरनात अधिक भर पडेल असे सांगत त्यांनी घरीच इकोब्रीक्स कसे निर्माण करायचे, इकोब्रिक्सद्वारे शोभेच्या वस्तू कशा तयार करायच्या याबद्दल माहिती दिली.

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मनपाचे अनीत कोल्हे, योगेश बासलवार, प्रिया राहंगडाले, राजेद्र झुलके यांच्यासह मनपा अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जुनपासून प्रवेश - देवेंद्र फडणवीस

Sat Jan 6 , 2024
· जिल्हा नियोजन समितीची बैठक · उपलब्ध निधी 15 फेब्रुवारी पर्यंत खर्च करा · 472.63 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी · पायाभूत विकास कामांना प्राधान्य · अंमलबजावणीमध्ये गडचिरोली राज्यात दुसरा गडचिरोली :- गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करुन देण्यात असून आवश्यक सर्वसुविधा उपलब्ध झाल्यामुळे येत्या जुन 24 पासून प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com