शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पाहा कोणी कोणी घेतली शपथ

मुंबई – शिंदेःफडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राजभवन येथे 11 वाजता पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

शपथ घेतलेल्या मंत्र्यांची नावं शिंदे गटाकडून – तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांनी संधी देण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिला परिषद क्षेत्र अंतर्गत नवेझरी ग्राम मंडळ येथे आढावा बैठक संपन्न.

Tue Aug 9 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया – तिरोडा तालुक्यातील नवेझरी गावांमध्ये जिला परिषद व पंचायत समिति अंतर्गत आढावा बैठक ग्राम मंडल नवेझरी येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन करून महापुरुषांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले . या आढावा बैठकीत आमदार विजय रहांगडाले तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्र ,तुमेश्वरी बघेले जिला परिषद सदस्य,दिपाली टेंभेकर पंचायत समिति सदस्य,तेजराम चव्हाण पंचायत समिती सदस्य, महेंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights