“विक्रम गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केले” : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 

मुंबई :- रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे मापदंड प्रस्थापित केले. हिंदी व मराठी चित्रपट तसेच रंगभूमीवर प्रदीर्घ काळ काम करताना त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. काही चित्रपट व नाटके केवळ त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे लोकांच्या लक्षात आहेत. सामाजिक प्रश्नांवर देखील गोखले यांनी आपली मते निर्भीडपणे मांडली. अलीकडेच दिनांक १५ ऑगस्ट रोजी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली, परंतु दुर्दैवाने ती भेट शेवटची ठरली. या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने संविधान दिन साजरा

Sun Nov 27 , 2022
भंडारा : – भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक येथील पूर्णकृती पुतळ्याला माल्या अर्पण करत संविधान दिनानिमित्ते पुतळ्याला पुष्पहार संविधान दिन चिरायू हो अश्या घोषणाबाजी केली . 26 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारतासाठी अतिशय खास दिवस आहे. हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतामध्ये संविधान औपचारिकपणे स्वीकारण्यात आले, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. भारतीय राज्यघटनेने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com