यवतमाळ :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. निवडणुक प्रक्रिया पुर्ण करण्याच्या दिनांकापर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे आचारसंहिता कालावधीत दि.25 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी कळविले आहे.