– मनपाच्या कर्मचाऱ्यांनी दिली मतदानाची ग्वाही
नागपूर :- निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असून, यात प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य देखील आहे, याची जाणीव करून देणारी “मतदान निश्चय शपथ” नागपूर महानगरपालिका मुख्यालय व मनपाच्या दहाही झोन कार्यालयात गुरुवारी(ता: ३१) घेण्यात आली.
सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात उपायुक्त विजय देशमुख, मुख्य अभियंता लिना उपाध्ये, अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, वैद्यकिय अधिकारी दिपक सेलोकर, शिक्षणाधिकारी साधना सयाम, मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे, नगर रचनाकार ऋतुराज जाधव, कार्यकारी अभियंता मंगेश जाधव, विधी विभागाचे सूरज पारोचे, निगम अधिक्षक राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, निवडणूक विभागाचे अनंत नागमोते, रितेश लोखंडे, प्रमोद हिवसे, अमोल तपासे, जितेश धकाते, राजेश गजभिये, स्वप्नील खरे, विनोद डोंगरे, शैलेश जांभुळकर यांचे सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.