बोरडा नाला बंधा-याचे लोखंडी तरापे चोरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- अंतर्गत ७ किमी अंतरावरील मौजा बोरडा (गणेशी) येथे नाल्याचे पाणी अडविण्यास बंधा-याला लावलेले लोखंडी तरपे १० जुने किमत दहा हजार रू चे चोरून नेल्याने फिर्यादी उपसरपंच नरेंद्र ठाकरे यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसानी अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे . 

बोरडा (गणेशी) ग्राम पंचायत उपसरपंच नरेद्र गोंविंद ठाकरे वय ४२ वर्ष यांना ग्रा पं चपराशी यांनी फोन करुन सांगितले की, नाल्याचे पाणी अडविण्यासाठी बंधा-याला लावलेले जुने वापरते लोखंडी तरापे दिसुन येत नाही. अश्या माहिती वरुन नरेंद्र ठाकरे यांनी ग्रा पं सरपंच, ग्रामसेवक व इतर सदस्य यांच्या सोबत घटनास्थळी जावुन पाहिले असता नाल्याचे पाणी अडविण्यासाठी बंधा-याला लावलेले लोंखडी तरापे जुने वापरते २० नग किंमत अंदाजे ५०० रु प्रती नग प्रमाणे एकुण १०,००० रुपयाचा मुद्दे माल कोणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेल्याने फिर्यादी उपसरपंच नरेंद्र ठाकरे यांचे तक्रारीने पोस्टे कन्हान येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान थानेदार प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोहवा प्रविण चव्हाण हे पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भगवान महावीरांचा २६२२ वा जन्म कल्याणाक महोत्सव मुंबईत साजरा

Tue Apr 4 , 2023
भगवान महावीरांची अहिंसा, अपरिग्रह व अनेकांताची शिकवण आज अधिक प्रासंगिक : राज्यपाल सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ होऊ नये यासाठी प्रयत्न केले मुंबई :- आज रशिया – युक्रेन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. अनेक देश आर्थिक अरिष्टांना तोंड देत आहेत. शेजारच्या देशांमध्ये महागाई कमालीची वाढली आहे. लोकांना अन्न मिळणे दुरापास्त झाले आहे. अश्यावेळी भारताने भगवान महावीरांनी सांगितलेला करुणा भाव पुन्हा जागवावा तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!