– दिनेश दमाहे,मुख्य संपादक
नागपूर – मागील काही दिवसापासुन पोलीस स्टेशन सदर, नागपूर शहर हद्दीतील गड्डीगोदाम भागात चोरी व घरफोडीचे प्रमाणे वाढल्याने पोलीस स्टेशन सदर येथे 1) अपराध क्रमांक 43/2022 कलम 457,380 भादंवी 2) अपराध क्रमांक 50/2020 कलम 457,380 भादंवी चे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस स्टेशन सदर नागपूर शहर यांनी पोलीस स्टेशन येथे कार्यरत गुन्हे प्रकटीकरण पथकतील अधिकारी व अंमलदार यांना चोरी व घरफोडी करणारे आरोपी तपासुन संशयीत मिळुन आलेल्या इसमांना चेक करुन गड्डीगोदाम परीसरात सापळा रचना बाबत आदेशीत केल्यावरुन गुन्हे प्रकटकरण पथकाचे प्रमुख पोउपनि कृष्णा पुल्लेवाड यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या अंमलदार यांच्यासह गड्डीगोदाम भागात सतत पेट्रोलींग करुन सापळा रचुन आरोपीचा शोध घेत असतांना यातील अटक आरोपी हा घरफोडी करण्याच्या बेतात असतांना गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना दिसुन आल्याने तो त्याच्या जवळील गुन्हयातील चोरी केलेली मोटार सायकल घेवुन पळु लागला यावरुन अधिकारी व अंमलदार यांना संशय आल्याने त्यांना त्यास पाठलाग करुन पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारणा केली असता त्याने आपले नाव सुरज सिध्दार्थ सोमकुंवर वय 25 वर्ष रा. मैत्री कॉलोनी, कपील नगर पो.स्टे. कपील नगर, नागपूर शहर असे सांगितले नमुद आरोपी याचे गुन्हे अभिलेख पडताळणी केला असता नमुद आरोपीवर नागपूर शहरातील विविध पोलीस स्टेशन येथे चोरी व घरफोडीचे एकुण 18 गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. आरोपी यास बारकाईने विचारपुस केली असता त्याने पोलीस स्टेशन सदर हद्दीत गड्डीगोदाम भागात 1) अपराध क्रमांक 43/2022 कलम 457,380 भादंवी 2) अपराध क्रमांक 50/2020 कलम 457,380 भादंवी मध्ये घरफोडी केल्याचे कबुली दिली आहे. आरोपी कडुन 1) टि.व्हि.एस. आपाची गाडी क्र. एम.एच.31-डि.एक्स.-2583 कि.अं रू. 60,000/- 2) बुलेट काळा लाल रंगाची गाडी क्र. एम.एच.31-एफएन.-457 कि.अं रू. 1,80,000/- 3) एक सॅमसंग कंपनीचा एम 30 मोबाईल किंमती अंदाजे रू. 15,000/- 4) एक टेनार कंपनीचा मोबाईल किंमती अंदाजे 12,000/- रुपये 5) एक ओपो कंपनीचा मोबाईल किंमती अंदाजे रू. 13,000/- असा एकुण रू. 2,80,000/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमुद आरेापीस अटक करण्यात आली असुन स़द्या आरोपी पोलीस स्टेशन सदर येथे 3 दिवस पीसीआर वर आहे. आरोपीकडुन पोलीस स्टेशन सदर, नागपूर शहर येथील 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे.
सदरची कामगिरी नागपूर शहराचे मा. पोलीस उपायुक्त(परि.क्र.2) विनीता सााहु, मा. सपोआ(सदर विभाग) माधुरी बाविस्कर यांच्या निर्देशान्वये पोलीस स्टेशन सदरचे वरिश्ठ पोलीस निरिक्षकश्री विनोद चौधरी, पोलीस निरिक्षक विशाल काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि पोउपनि कृष्णा पुल्लेवाड, पोहवा रविंन्द्र लाड, पोहवा राजेश गिरडकर, नापोशि सतिर गोहत्रे, नापोशि चेतन सिरसाट, पोलीस अंमलदार आशिष वानखेडे यांनी केली आहे.