जिल्हा परिषदेत राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा

नागपूर :- जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागामध्ये “राष्ट्रीय आयुर्वेद दिवस” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये हर घर हर दिन आयुर्वेद याबाबत जनजागृती व तपासणी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.जिल्हास्तरीय कार्यक्रमांमध्ये आयुर्वेदाबद्दल महत्त्व वाढण्याचा संदर्भाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय आयुर्वेद दिवस कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी (आयुष) यांनी आपले संस्थेमध्ये आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार वाढवण्याबाबत प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षा मेश्राम,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. असीम इनामदार डॉ. सचिन हेमके, जिल्हा आयुष अधिकारी डॉ सुरेश मोटे, साथरोग अधिकारी डॉ दामले व जिल्ह्यातील आयुर्वेदिक व ऍलोपॅथिक व पथकचे संपूर्ण वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजनाकरिता जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सुरेश मोटे व जिल्हा आयुष कक्षातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  काकडे, क्षीरसागर, विकास , गायकवाड,  शेख व  राऊत यांनी सहकार्य केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीपावली निमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या शुभेच्छा

Sun Oct 23 , 2022
मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दीपावलीनिमित्त आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीनिमित्त राज्यातील समस्त बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. आनंद, चैतन्य व प्रकाशाचा हा सण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, संपन्नता व उत्तम आरोग्य घेऊन येवो तसेच आपले राज्य विविध क्षेत्रात प्रगतीची शिखरे सर करो, ही मंगल कामना करतो. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com