संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– प्रस्तावित कत्तलखाना रद्द न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या दिला ईशारा
कामठी :- नागपूर जिल्हा प्रशासनाचे वतीने कामठी तालुक्यातील पवनगाव येथे प्रस्तावित कत्तलखाना मंजूर केला असून कत्तलखान्याला पवनगाव -धारगाव- घोरपड -रणाळा -येरखेडा -अजनी- गादा परिसरातील गावकऱ्यांचा मोठा विरोध असून कोणत्याही परिस्थितीत पवनगाव येथे कत्तलखाना होऊ नये याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गावकऱ्यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आले . तसेच हा प्रस्तावित कत्तलखानाची मंजूरी सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी रद्द करून आश्वस्थ करावे असे न झाल्यास भारतीय जनता पार्टी चे सर्व सरपंच व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार प्रसार बंद करून निवडणुकीवर बहिष्कार घालणार असे सर्वानुमते घेण्यात आलेल्या निर्णयाचा ईशारा सुद्धा सादर निवेदनातून देण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा प्रशासनाच्या वतीने कामठी तालुक्यातील पवनगाव येथील खसरा क्रमांक 54 (2)मधील 3.13 हेक्टर जमीन कत्तलखाना बांधकामासाठी मंजूर केली असून त्याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या वतीने 17 करोड रुपयांचा निधी मंजूर केला आहे प्रस्तावित कत्तलखान्यास पवनगाव, धारगाव ,घोरपड, शिरपूर ,रनाळा आजनि, गादा, परिसरातील गावकऱ्यांचा तीव्र विरोध करीत असता प्रस्तावित कत्तल खाण्याच्या समस्या त्वरित निर्णय घ्यावा नाही तर आगामी लोकसभा निवडणुकीत कामठी तालुक्यातील भाजप व विविध गावातील सरपंच बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले प्रस्तावित जमीन जागा मोजणीसाठी आलेल्या जिल्हा प्रशासन व भूमापन अधिकारी यांना 11 व 22 मार्च व पाच एप्रिला गावकऱ्यांनी तीव्र विरोध करून कोणत्याही परिस्थितीत मोजणी करू दिली नाही व पवनगाव परिसरात कोणत्याही परिस्थितीत कतारखाना होऊ देणार नसल्याचे गावकऱ्यांनी निर्धार केला आहे आज कामठी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता आमदार टेकचंद सावरकर नागपूर जिल्हा भाजप महामंत्री अनिल निधान याच्या नेतृत्वात पवनगाव येथील गावकऱ्यांनी निवेदन देऊन कत्तलखान्याची समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देतेवेळी खासदार कृपाल तुमाने ,रामटेक लोकसभेचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे रामटेकचे आमदार ऍडव्होकेट आशिष जयस्वाल , नागपूर जिल्हा भाजप अध्यक्ष सुधाकर कोहळे ,नागपूर जिल्हा भाजप महामंत्री अनिल निधान, कामठी तालुका भाजप अध्यक्ष उमेश रडके, एडवोकेट आशिष वंजारी, ब्रह्मानंद काळे पवनगावच्या सरपंच नेहा किरण राऊत ,कामठी तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष किरण राऊत ,योगेश डाफ, गुंमठाला चे सरपंच प्रणाली डाफ, गाद्याचे सरपंच सचिन डांगे, पवनगावचे उपसरपंच रामचंद्र रेवाडे, कडोलीचे सरपंच लक्ष्मण करारे ,रनाळ्याचे सरपंच पंकज साबळे, घोरपडच्या सरपंच तारा कडू ,येरखेडा चे माजी सरपंच मंगला कारेर्मोरे, मनीष कारेमोरे ,गौवरीचे सरपंच ऋषी भेंडे, राजकिरण बर्वे ,कुबेर महल्ले गजानन तिरपुडे ,कुणाल कडू सह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.