जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारतीय तिरंदाजांच्या अनुकरणीय कामगिरीचे उपराष्ट्रपतींनी केले कौतुक

नवी दिल्‍ली :-उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज वरिष्ठ सभागृहात बर्लिन, जर्मनी येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांच्या कामगिरीचे कौतुक केले. उपराष्ट्रपती म्हणाले की, क्रीडापटूंची कामगिरी राष्ट्राला प्रेरणा देणारी आहे.

जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमधील आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल भारतीय तिरंदाजांचे कौतुक करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, क्रीडापटूंच्या यशामुळे क्रीडा क्षेत्रातली आपली प्रगती दिसून येते, हे यश खेळाडूंची मेहनत आणि समर्पणाचे साक्ष आहे.

उपराष्ट्रपती म्हणाले की, 17 वर्षीय आदिती गोपीचंद स्वामीने चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून देशासाठी पहिले वैयक्तिक जागतिक विजेतेपद मिळवले. विजेतेपद पटकावणारी ती जगातील सर्वात युवा खेळाडू ठरली आहे.

पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या ओजस प्रवीण देवतळेचेही त्यांनी कौतुक केले. जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये असे विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय पुरुष तिरंदाज ठरला आहे.

महिला तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नम हिने महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड स्पर्धेत कांस्यपदक जिंकले, तर ज्योती वेन्नम, परनीत कौर आणि अदिती गोपीचंद स्वामी यांच्या संघाने महिलांच्या कंपाउंड सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत उत्कृष्ट कामगिरी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रेरणा महिला संगठन का सावन मेला हर्षोल्लास से संपन्न

Mon Aug 7 , 2023
– महिलाओं की उमड़ी भीड़ : मेहंदी और झूलों का उठाया आनंद – समाज को एकसूत्र मैं बंधना समय की आवश्यकता- मनोजकुमार नागपुर :- महानगर में महिलाओं के उत्थान में अग्रसर प्रेरणा महिला संगठन द्वारा शनिवार 5 अगस्त को रविनगर स्थित अग्रसेन भवन में एक दिवसीय भव्य सावन मेला ( तीज मेला) महिलाओं की भारी भीड़ के बीच हर्षोल्लास से […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com