संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा शिवार टोल प्लाॅजा चे मागुन असलेले मनसर फिडर ने नविन गोंडे गावला विधृत पुरवठा देणारी ३३ केव्ही ची ३२ स्पँन विजेची तार किंमत सत्तर हजार रूपयाची कोणीतरी अज्ञात टोळीच्या चोरट्यांने चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी अभियंता सागर वाघमारे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार कन्हान ग्रामिण महावितरण केंद्राचे सहायक अभियंता सागर गुप्ता वाघमारे वय २७ वर्ष रा. कोराडी यांना सोमवार (दि.३१) जुलै ला सकाळी ११ वाजता दरम्यान वरिष्ठ तंत्रज्ञ भन्नारे यांचा फोन आला व त्यांनी सांगितले कि, मनसर फिडर ने नविन गोंडेगाव ला ३३ केव्ही विधृत पुरवठा देणारी विजेची तार कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. अश्या माहिती वरुन सागर वाघमारे यांनी घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता अंदाजे ३२ स्पॅन विजेचे तार किंमत ७०,००० रुपयाची चोरीला गेल्याचे दिसुन आले. एक स्पॅन मधिल अंतर ६० मिटर असते. सदर विजेचे तार नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील नविन कांद्री टोल टैक्स मागुन तर बोरडा रोड वरील कॅनल पर्यंत घेऊन गेल्याचे आढळल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी अभियंता सागर वाघमारे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र.४९०/२३ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार उमाशंकर पटेल हे करित असुन आरोपीचा शोध घेत आहे.