स्वाईन फ्ल्यू मृत्यू विश्लेषण समितीने घेतला शहरातील स्थितीचा आढावा

नागपूर :- स्वाईन फ्ल्यू मृत्यू विश्लेषण समितीद्वारे (Death Audit Committee) शुक्रवारी (ता.25) नागपूर शहरातील स्वाईन फ्ल्यूच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.

मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात पार पडलेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सचिव वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुहास गजभिये, आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या प्रतिनिधी डॉ. शितल मोहने उपस्थित होते.

बैठकीत इन्फल्युएंझा एएच 1 एन 1 मुळे झालेल्या दोन मृत्युचे विश्लेषण करण्यात आले. त्याचे विश्लेषण केले असता 1 रुग्ण नागपूर ग्रामिण व दुसरा नागपूर शहरातील असल्याचे समजले. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू इन्फल्युएंझा एएच 1 एन 1 मुळे झाल्याचे निष्पन्न झाले. 1 जानेवारी 2023 पासून स्वाईन फ्लू मृत्यु विश्लेषण समितीच्या 6 बैठक झालेल्या आहेत.

यामध्ये एकूण 8 संशयित इन्फल्युएंझा एएच 1 एन 1 मृत्यू चे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यापैकी 5 मृत्यू इन्फल्युएंझा एएच 1 एन 1 मुळे झाल्याचे निष्पन्न झाले व यामध्ये 60 वर्षावरील रुग्णांची संख्या 5 इतकी होती. यापैकी 2 महिला व 3 पुरुष होते.

मृत्यू विश्लेषण समितीद्वारे इन्फल्युएंझा एएच 1 एन 1 मुळे विश्लेषणावरून काही शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. यात सर्व आरोग्य संस्था यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहव्याधी असणारे व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक यांची फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळताच योग्य ते उपचार सुरु करावे व आरोग्य स्थितीवर लक्ष देऊन आवश्यकतेनुसार रुग्णालयात संदर्भित करावे. ILI व सारी रुग्णाबाबत क्षेत्रीय सर्वेक्षण सक्षम करावे, ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्या रुग्णंनी इन्फल्युएंझा ए लसीकरणाच्या डोज घ्यावा, वैयक्तिक स्वच्छता जसे, वारंवार हात धुणे, सॅनीटायझरने हाथ निर्जंतुकीकरण करणे, खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. वारंवार स्पर्श होणा-या वस्तू, जागा निर्जंतुकीकरण करा. आपणास फ्ल्यू सदृष्य लक्षणे असल्यास घरीच थांबा गर्दीत जाऊ नका, भरपूर विश्रांती घ्या व भरपूर पाणी प्या. ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असण्या-या व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, लहान मुले यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सर्व खाजगी रुग्णालयांनी त्याच्या आरोग्य संस्थेत उपचाराखाली असलेल्या इन्फल्युएंझा एएच 1 एन 1 रुग्णाची

माहिती मनपा साथरोग विभागास देण्यात यावी, विभागाव्दारे रुग्णाच्या निवासी क्षेत्रात सर्वेक्षण करुन फ्ल्यू सदृष्य रुग्णाचा शोध व उपचार करण्यात येईल त्यामुळे रुग्णाचा प्रसार होणार नाही.

हे करा :- 

• वारंवार साबण व स्वस्छ पाण्याने हात धुवा.

• पौष्टिक आहार घ्या.

• लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा

• धुम्रपान टाळा

• पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या

• भरपूर पाणी प्या

 हे करु नका:- 

• हस्तांदोलन

• सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका

• डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका

• आपल्याला फ्ल्यू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Special Assembly on International Dog Day at DPS MIHAN

Sat Aug 26 , 2023
Nagpur :-The International Dog Day assembly took place on August 25, 2023, at DPS Mihan, aiming to foster a sense of care and responsibility among children towards dogs. The event was particularly geared towards the pre-schoolers of Preparatory Fawns, who participated with immense enthusiasm in the special assembly. Kicking off with a heartfelt prayer, the assembly set a tone of […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com