सातगाव (वेणा) येथील नागरिकांच्या समस्या कोण मार्गी लावणार ?
आम्ही घरे खाली करणार नाही याच ठिकाणी मरून जाऊ
पण खाली करणार नाही -वर्षा ईखार सातगाव (वेणा )
सातगाव :-ग्रामपंचायतचे सरपंच सातगाव येथील रोज सकाळ संध्याकाळ पुर्ण गावात भोंगा वाजून गावकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. आणि पोलीस स्टेशनची धमकी व बेकायदेशीर रित्या नोटीसची अंमलबजावणी करून गावकऱ्यांची दिशाभूल करित असा आरोप सरपंच योगेश सातपुते यांच्यावर पत्रकार परिषदेमध्ये झोपडपट्टीधारक गावकऱ्यांनी लावला. सामाजिक व बांधिलकी काळीमा फासल्यासारखे कृत्य करून लोकांमध्ये अशांतता आणि सुव्यवस्था भंग करून मानसिक तसेच शारीरिक त्रास देऊन लोकांमध्ये समाजामध्ये वाद निर्माण करणे असा आरोप यावेळी लावलेला आहे. सातगाव (वेणा) हे पुनर्वसन गाव असून याची स्थापना 1997 झाली. या गावांमध्ये सात गावे एकत्रित येऊन या सात गावाची स्थापना झाली. जवळजवळ यांना २० वर्षे झाले आहे.
गरिबांना पहिले घरे दया, त्यानंतर गरिबांना बेघर करा. अशी मागणी यावेळी उपस्थित 50 गावकऱ्यांनी परिषदेत पत्रकारांना केली.