खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच!” उद्धव ठाकरेंना झटका, राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय

– राहुल नार्वेकर यांच्याकडून महाराष्ट्राच्या महानिकालाचं वाचन, खरी शिवसेना म्हणून शिंदेंच्या शिवसेनेला मान्यता

मुंबई :- खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे असं आज राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची ही घटनाच हे सांगते आहे की त्यात कशी पदरचना आहे. त्यानुसारच खरी शिवसेना कुणाची आहे? याचा निर्णय घेतला आहे. २१ जून २०२२ ला शिवसेनेत दोन गट पडले. सगळ्या पुरावे, साक्षी यांचा विचार करता मी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे ही मान्यता देतो असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

काय काय म्हणाले आहेत राहुल नार्वेकर?

सुभाष देसाई विरुद्ध राज्यपाल या प्रकरणाचं वाचन आधी राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत, त्यामुळे मी निवडणूक आयोगाने दिलेली घटना विचारात घेतली आहे असंही राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुख कोण यावरुन गोंधळ असल्याचं दिसलं. उद्धव ठाकरेंनी जी शिवसेनेची घटना दिली त्यावर कुठलीही तारीख नाही असंही राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची १९९९ ची घटना मी मान्य करतो असंही राहुल नार्वेकर म्हणाले. तसंच उद्धव ठाकरे हे उलटतपासणीसाठी आले नाहीत त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र विचारात घेतलेलं नाही असंही ते म्हणाले.

NewsToday24x7

Next Post

लोकशाहीवरील विश्वास प्रगाढ करणारा निकाल : ॲड. धर्मपाल मेश्राम

Thu Jan 11 , 2024
नागपूर :- मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल दिला. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हा महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचा लोकशाहीवरील विश्वास प्रगाढ करणारा आहे, अशी प्रतिक्रीया ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली. जून २०२२ पासून सदर विषय मा. न्यायालयात प्रलंबित होता. त्यावर आज अखेर अंतिम निर्णय लागल्याचा आनंद आहे. डॉ. बाबासाहेब […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com