संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 14 एप्रिल रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने आणि जल्लोषाने साजरी व्हावी तसेच 14 एप्रिल च्या सायंकाळी निघणारी मिरवणूक ही यशस्वी पार पडत वाहतूक व्यवस्थेत कुठलीही कोंडी निर्माण न होता सुरळीत वाहतुकीसह अम्ब्युलेन्स तसेच अत्यावश्यक सेवेत कुठलाही अडथळा निर्माण न होता सर्वाना सोयीचे व्हावे व कायदा ,सुव्यवस्था नियंत्रणात राहावे या उद्देशाने कामठी पोलीस व वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने केलेल्या नियोजन नुसार 14 एप्रिल निमित्त निघणारी मिरवणूक ही यशस्वी ठरली.
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कामठी शहरातील तसेच आजूबाजूचे गाव खेड्यातील लोक देखील समूहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने वाजत गाजत येत असतात. दरवर्षी सदर ठिकाणी 25 ते 30 हजार लोकांची गर्दी जयस्तंभ चौकामध्ये जमते त्यावेळी पोलिसांसमोर खूप मोठे आव्हान उभे असते की सदरची मिरवणूक पार पडत असताना जो कामठी शहरातून नागपूर जबलपूर हायवे जातो तो देखील सुरू ठेवणे अत्यंत गरजेचे असते.
त्यावेळी पोलिसांची नियोजन खूप महत्त्वाचे ठरते परंतु एवढ्या मोठ्या संख्येने लोक त्यांच्याकडील वाहनांसह जयस्तंभ चौक येथे आल्यामुळे वाहतुकीच्या नियोजनाचा बोजवारा वाजतो.
याबाबत कामठी शहरातील अनेक लोकांनी प्रतिष्ठित नागरिक यांनी पोलिसांना सांगितलेले आहे. पोलिसांनी नियोजन करून देखील अचानक वाढणाऱ्या संख्येमुळे वाहतुकीची कोंडी होते तसेच मिरवणूक देखील तासंनतास एकाच जागेवर ठप्प राहते.
परंतु यावेळी पोलीस उपायुक्त निकेतन कदम परिमंडळ 5 यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर कामठी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे नवीन कामठी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे जुने कामठी, पोलीस निरीक्षक पतंगे वाहतूक विभाग यांनी मागील 10 वर्षातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा तसेच जयस्तंभ चौक, जय भीम चौक येथील होणारी गर्दी तसेच सदर परिसरातील लोकांना येण्या जण्यासाठी होनारा अडथळे तसेच वाहतूक बाबत आढावा घेऊन यावर्षीचे नियोजन अत्यंत कुशलतेने केले.
जय भीम चौक जयस्तंभ चौक येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची ड्युटी, बॅरिकेट्स लावून नियोजन, वाहतूक वळण अत्यंत कुशलतेने केल्यामुळे 14 एप्रिल रोजी स्थानिक नागरिक तसेच मिरवणूक काढणारे नागरिक तसेच सदर राष्ट्रीय मार्गावरून होणारे वाहतूक यांना कोणत्याही प्रकारे अडथळा आला नाही व अत्यंत कुशलतेने पहिल्यांदाच 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कामठी शहरांमध्ये सुलभ कोणत्याही अडथळ्याविना वाहतूक ठप्प न होता उत्साहात आणि सुव्यवस्थेत पार पडली.याबाबत कामठी शहरातील सर्व नागरिकांनी पोलीस दलाचे मनापासून आभार मानले.तसेच यानंतर सुदधा निघणाऱ्या विविध मिरवणुका याच नियोजित पद्ध्तीने पार पाडाव्या असे पोलीस विभागाला मार्गदर्शीत करण्यात आले.