पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यशाळेतून या योजनेला गती मिळावी, जिल्ह्यातील कारागिरांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी – जिल्हाधिकारी

भंडारा :- पीएम विश्वकर्मा योजनेतून जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या वाढावी व योग्य त्याला भारतीय पर्यंत पीएम विश्वकर्मा पोहोचावी यासाठी कार्यक्षेच्या आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेमधून संबंधितांनी आपले शंका निरसन करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज केले.

आज नियोजन सभागृहात पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेस सर्व गटविकास अधिकारी तसेच सरपंच सोबतच विश्वकर्मा कारागीर ज्यांनी सदर योजनेमध्ये अर्ज नोंदविलेले आहेत अशा लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर,मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश तईकर,जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी देविपुत्र तसेच खादी व ग्रामोद्योग विभागाचे सहाय्यक संचालक व्ही.खरे उपस्थित होते.

कार्यशाळेचे प्रास्ताविक खरे यानी केले.विश्वकर्मा योजनेत १८ प्रकारच्या कलेच्या कारागिरांना प्रशिक्षण देण्यात येईल.यासाठी सुविधा केंद्रातून कारागिरांना निःशुल्क अर्ज देण्यात येतील.त्यामध्ये सर्व बाबी या ऑनलाईन आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी वेगवेगळ्या कलेचा भारताला संपन्न वारसा असल्याचे त्यांनी सांगितले.तो हस्तकला,शिल्पकलेचा वारसा पुढील पिढीसाठी या योजनेतून पुनर्जीवित होईल.सरपंचाच्या माध्यमातून गाव पातळीवर या योजनेची नोंदणी करण्यात येत आहे.अस्तंगत होत असलेल्या कला, कौशल्याला यातून मुख्य प्रवाहात आणण्याचा या योजनेचा उद्देश लक्षात घेवून या योजनेचा प्रचार प्रसार करण्यात यावा.

सर्व नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी व आणि सरपंच यांनी या योजनेतील येणाऱ्या अडचणी, शंका यांचे निरसन आजच्या कार्यशाळेत करून घ्यावे .आणि त्यानंतरही काही समस्या उद्भवल्या प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल.असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार खादी व ग्रामोद्योग विभागाचे मनीष झा यांनी केले.

पीएम विश्वकर्मा योजेनेची वैशिष्ट

*व्याप्ती पारंपरिक कारागीर आणि हस्तकला-कारागरिकांचे कुटुंब-गुरु शिष्य परंपरा

*18 पारंपरिक व्यवसाय समाविष्ट

* गेल्या 5 वर्षामध्ये भारत सरकार आणि राज्य शासनाच्या योजनांमध्ये यासारखे जे समाविष्ट आहे.ते वगळता पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र पत सहाय्य कौशल्य श्रेणी-सुधारणा टूलकिट इन्सेन्टिव्ह डिजिटल व्यवहारासाठी इन्सेन्टिव्ह विपणन सहाय्य

*प्रक्रिया अर्ज आधारित नोंदणी ग्रामपंचायत प्रमुख यूएलबी कार्यकारी प्रमुख आणि जिल्हा अंमलबजावणी समितीद्वारे सत्यापन निरिक्षणासाठी छाननी समिती तीन-स्तरीय अंमलबजावणी आराखडा

*एमएसएमई,एमएसडीई आणि डीएफएसद्वारे संयुक्तपणे अंमलबजावणी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच!” उद्धव ठाकरेंना झटका, राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय

Wed Jan 10 , 2024
– राहुल नार्वेकर यांच्याकडून महाराष्ट्राच्या महानिकालाचं वाचन, खरी शिवसेना म्हणून शिंदेंच्या शिवसेनेला मान्यता मुंबई :- खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे असं आज राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची ही घटनाच हे सांगते आहे की त्यात कशी पदरचना आहे. त्यानुसारच खरी शिवसेना कुणाची आहे? याचा निर्णय घेतला आहे. २१ जून २०२२ ला शिवसेनेत दोन गट पडले. सगळ्या पुरावे, साक्षी यांचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!