स्थानिक गुन्हे शाखा व बुट्टीबोरी पोलीसांनी लावला १२ तासात खुनाच्या गुन्हयाचा उलगडा

– दि. ४/०८/२०२४ रोजी सकाळी उघड झालेल्या खुनाच्या गुन्हयातील अनोळखी मृतकाची ओळख पटवून महीलेसह दोन आरोपीस बुटटीबोरी पोलीसांनी केले अटक

नागपूर :- फिर्यादी नामे सुधाकर जैराम वानखेडे वय ५६ वर्ष रा. मोहगांव वार्ड नं. ०५ ता. जि. नागपूर व्यवसाय पोलीस पाटील मोहगांव यांना शेतकरी बाबूलाल उईके यांनी दिलेल्या माहीतीवरून पोस्टे बु‌ट्टीबोरी हददीतील मौजा मोहगाव येथील साइलीला लेआउट मध्ये एक अनोळखी इसम पडलेला असुन त्याचा गळा कापला असुन, गळ्यातून रक्त निघत आहे. अश्या माहीतीवर फिर्यादी यांनी घटणास्थळी जावुन शहानिशा केली व १३/०० वा. पोलीसांना कळवले वरून पोलीसांनी घटणास्थळी पोहचुन तात्काळ तपासात चके फिरवली. तसेच फिर्यादी यांनी पोस्टेला तोडी रिपोर्ट दिल्यावरून पोस्टेला कलम १०३ भान्यास अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला.

सदर घटणेतील मृतक हा अनोळखी असल्याने पोलीसांना मृतकाची ओळख पटवून आरोपीचा शोध घेणे पोलीसांसमोर आव्हाण होते. बु‌ट्टीबोरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण चे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गोपनिय खबरे व तांत्रीक बाबीचा अभ्यास करून अथक परीश्रम घेवून मृतक संतोष मनोहर चुन्ने रा. तकीया धंतोली नागपूर असल्याचे उघड केले व त्यानंतर मृतकाचे प्रेमसंबंध असलेल्या महीलेचा शोध घेवून महिला नामे नतु गंगाधर पेंदाम वय ३६ वर्ष रा. झेंडा चौक तकीया, धंतोली नागपूर हिला ताब्यात घेवून विचारपुस केली असता तिने सांगीतले की, मृतक संतोष मनोहर चुन्ने याचे त्याचे पत्नीसोबत घटस्पोट झाल्यापासुन प्रेमसंबंध होते तो तिला अलीकडच्या काळात खुप त्रास देत होता तसेच तिला व तिचे नव-याला मारहाण करीत होता, म्हणून कंटाळून तिने तिचा साथीदार राहुल रमेश गायकवाड याचे सोबत संगनमत करून एक महीण्या पुर्विच गुन्हयाचा कट रचुन, संतोष मनोहर चुन्ने यास मौजा मोहगाव येथील साइलीला लेआउट येथे सोबत आनुन मृतकाचा धारदार चाकूने गळा कापून जिवानिशी ठार मारले आहे. अश्या कबुली वरून न्यु गांधी लेआउट, गोदावरी नगर नागपूर येथे राहणारा महीलेचा साथीदार आरोपी राहुल रमेश गायकवाड वय ४० वर्ष यास राहते ठीकाणी शोध घेवून ताब्यात घेवून विचारपुस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्यावरून दोन्ही आरोपींना अटक केली असुन गुन्हा षडल्यापासुन अवघ्या १२ तासाचे आत मृतकाचा व आरोपीचा शोध घेवून दोन्ही आरोपी बटुटीबोरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांनी सयुक्त कार्यवाही करून अटक केले आहे. अटक आरोपी कडुन अधिक तपास सुरू असून गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव पोस्टे बुटटीबोरी करीत असुन, मा. न्यायालयाकडुन आरोपींचा दि. ९/८/२४ रोजी पर्यंत पीसीआर प्राप्त केला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी नागपूर विभाग नागपूर पूजा गायकवाड यांचे मार्गदर्शनात, पोनि ओमप्रकाश कोकाटे, पोनि हृदयनारायण यादव, सपोनि सतिश मेश्राम, सपोनि प्रशांत लभाने, पोउपनि पालीवाल, मपोउपनि पाचोडे पोहवा आशिष टेकाम, पोहवा कुणाल पारधी, पोहवा युनूस खान, पोहवा प्रशांत मांढरे, पोहवा इकबाल शेखा, पोहवा मयुर देकले पोहवा अरविंद भगत पोकों माधव गुटटे पोकों राकेश तालेवार पोकों दशरथ घुगरे मपोकों कविता बछले यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीतांना कोर्टातुन शिक्षा

Wed Aug 7 , 2024
वेलतूर :-  फिर्यादी नामे लवा वसंता सलोटे, वय ४२ वर्ष रा. भुयार यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. वेलतूर येथे अप. क्र. ४४/२२ कलम ४९८ (अ), ३०६, ३४ भादंवी कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. सदर गुन्हयात फिर्यादीची मृतक मुलगी व आरोपी हे पती पत्नी असुन फिर्यादीची मृतक मुलगी नामे सपना शेषराव उरकुडे वय २२ वर्ष रा. देवळी कला हिचे १० महिण्यापुर्वी आरोपी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!