संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– नगराध्यक्षाची निवडणूक थेट जनतेतून,नव्याने होणार प्रभाग रचना
कामठी :- कामठी नगर परिषदचा पंचवार्षिक कार्यकाळ 17 फेब्रुवारी 2022 रोजी संपला असून त्यानंतर कामठी नगर परिषद मध्ये प्रशासक पदाचा कारभार सुरू आहे.त्यानंतर सर्वाना नगर परिषद निवडणुकीची उत्सुकता आहे.मात्र आज दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून गेला एकीकडे लोकसभा निवडणुका होण्याची लगबग आहे मात्र कामठी नगर परिषद निवडणुकीचा कुठलंही मुहूर्त निघालेला नाही.मात्र राज्य शासनाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगर पालिका निवडणूक ही तीन सदस्य पद्ध्तीने होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार कामठी नगर परिषद ची आगामी निवडनुक नगराध्यक्ष थेट जनतेतून व त्री सदस्य पद्धतीने होणार आहे. त्यानुसार नगर परिषद च्या प्रभाग रचनेच्या खेळात पुन्हा गुगली होताना दिसत आहे.
..कामठी नगर परिषद निवडणुका लक्षात घेता कामठी नगर परिषद च्या द्विसदस्यीय पद्ध्तीने 16 प्रभाग ठरले होते त्यात बदल करून 17 प्रभाग करण्यात आले होते तशी आरक्षण सोडत सुद्धा काढण्यात आली होती.मात्र नुकत्याच राज्य शासनाने मंत्रीमंडळात घेतलेल्या निर्णयानुसार तीन सदस्यीय प्रभाग पद्ध्तीने निवडणुका होऊ लागल्या आहेत त्यानुसार आता प्रभागाची संख्या 17 हुन कमी होणार आहे. तेव्हा आता ठरलेल्या प्रभाग पद्धत व आरक्षण सोडतीत नक्कीच बदल होणार आहे .मात्र या अदलाबदल प्रकारामुळे इच्छुक कार्यकर्त्यासमोर शासनाने पुन्हा प्रभाग रचनेच्या संख्येत फेरबदल करून गुगली टाकली आहे.
-सन 2001 मध्ये माजी मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख सरकारच्या काळात बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली तेव्हापासून दर पाच वर्षानंतर प्रभागाच्या संख्येत बदल करण्यात येत आहे. मागील काळात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नगर परिषद मध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्ध्तीने निवडणुका घेण्याचे ठरविले होते . बॉक्स:-लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे.ती निवडणूक प्रक्रिया मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.त्यानंतर पावसाळा येणार असल्याने कामठी नगर परिषद निवडणूक होण्याबाबत साशंकता आहे तसेच ऑक्टोबर मध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे कामठी नगर परिषद निवडणुका 2025 मध्ये होतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.