खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक

काटोल :- काटोल येथे फिर्यादी नामे प्रगती जितेंद्र तायडे वय २७ वर्ष रा. मदना ता. नरखेड हल्ली मुक्काम गोलु गजभिये यांचे घरी किरायाने होळी मैदान काटोल व आरोपी नामे जितेंद्र सिदधार्थं तायडे वय ३१ वर्ष रा. हल्ली मुक्काम गोलु गजभिये यांचे घरी किरायाने होळी मैदान काटोल हे पती पत्नी असुन फिर्यादी हि घरी हजर असता आरोपी हा दारू पिवुन घरी आले व फिर्यादीला बोलने चालु केले की तु फोनवर तुझ्या यारासोबत बोलत होती का मी घरून गेल्यावर तुझे असेच चालू राहते का असे म्हणुन फिर्यादीसोबत आरोपीने झंगडा भांडन करून मारहान केले व मारता मारता आरापीने उंदीर मारायचे पावडरची पुडी खिशातुन काढुन पुडी फोडुन प्याला मध्ये टाकुन प्यालात पानी टाकल व सतत मारहान करून तु हे पाणी पी आणी मर असे म्हणुन आरोपीने फिर्यादीला पुन्हा मारहान केले त्यामुळे माराच्या भितीने फिर्यादीने प्यालातील विषारी औषध पिले.

सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून पोस्टे काटोल येथे आरोपीविरूद्ध कलम ३०७ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि शितल खोब्रागडे या करीत आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे काटोल येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम, सपोनि शितल खोब्रागडे, पोहवा भुक्ते, पोशि सुधीर चव्हान सचिन डायलकर यांनी पार पाडली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद, वाहनासह एकूण ४०,४८,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Sat Apr 6 , 2024
– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई नागपूर :-दिनांक ०५/०४/२०२४ रोजी मौदा येथील स्टॉफ पोलीस ठाणे मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, भंडारा कडून नागपुरकडे अवैधरीत्या विनापरवाना रेती एलपी मध्ये लोड करून वाहतूक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमीवरून मारोडी येथे नाकाबंदी केली असता LP वाहन क्र. MH 27 BX 7983 यास स्टाफने थांबवून पाहणी केली असता सदर वाहनात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com