वार्षिक आमसभेत गाजला रणाळ्याच्या बिअर बार व दारू दुकानाचा मुद्दा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– कामठी पंचायत समितीची वार्षिक आमसभा विविध विषयांवर गाजली… 

-सर्व समस्या निकाली काढा अधिकाऱ्यांना आमदार टेकचंद सावरकर यांचे निर्देश…

कामठी :- आमदार टेकचंद सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली रणाळा येथील साबळे सेलिब्रेशन सभागृहात संपन्न झालेल्या कामठी पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत 26 जानेवारीला संपन्न झालेल्या ग्रामसभेत कुठल्याच दारु दुकाने तसेच बिअर बाल ला ना हरकत प्रमाणपत्र देऊन परवानगी देण्यात येणार नाही असे ठरले असले तरी नवीन बिअर बार ला परवानगी देण्यात आली तसेच दारू दुकाने उघडण्यात आली एकीकडे या गावात सुरू असलेल्या बिअर बार व दारू दुकानामुळे गावातील शांतता भंग झाली आहे असे मत माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे यांनी मांडल्या असता यावर लवकरच जिल्हाधिकारी महोदय बैठक घेऊन उभी बाटली,आडवी बाटली पद्ध्तीने निवडणूक घेऊन विषय मार्गी लावण्यात येणार असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले ज्यामुळे या वार्षिक आमसभेत इतर मुद्द्यासह रणाळा गावातील दारू दुकाने व बिअर बार चा मुद्दा चांगलाच गाजला.

याप्रसंगी सर्व विभागाकडे असलेल्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळावा यासाठी सर्वच विभागांनी प्रयत्नशील राहून, आमसभेत जनतेतून आलेले सर्व प्रश्न समस्या यांची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेऊन जनतेच्या समस्या तात्काळ निकाली काढाव्यात, असे निर्देश आमदार टेकचंद सावरकर यांनी दिले.

कामठी पंचायत समितीची सन2023-24 या वर्षाची वार्षिक आमसभा रनाळा येथील सभागृहात घेण्यात आली यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा परिषदच्या उपसभापती कुंदा राऊत,जी प सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे,जी प सदस्य मोहन माकडे,कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे,उपसभापती दिलीप वंजारी,पंचायत समिती सदस्य उमेश रडके, सविता जिचकार,सूमेध रंगारी, सोनु कुथे,एसडीओ सचिन गोसावी,तहसिलदार अक्षय पोयाम, बिडीओ प्रदीप गायगोले,विस्तार अधिकारी गावंडे, विस्तार अधिकारी मनीष दिघाडे,माजी नगराध्यक्ष माया चवरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम कामठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गावंडे यांनी मागील काही वर्षांपूर्वी झालेल्या वार्षिक आमसभा अहवालाचे वाचन केले.

या वार्षिक आमसभेला अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांवर शोकाज नोटीस देण्यात यावे,मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, विकासकामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही आमदार सावरकर यांनी सांगितले.

वार्षिक आमसभेचे संचालन बीडीओ प्रदीप गायगोले,प्रस्ताविक सहाय्यक गटविकास अधिकारी लोखंडे तर अहवालवाचन विस्तार अधिकारी गावंडे तर आभार विस्तार अधिकारी मनीष दिघाडे यांनी मानले. वार्षिक आमसभेला सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी,पत्रकार, सरपंच, उपसरपंच, सदस्य, शेतकरी, नागरिक, तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चंद्रपूर महानगरपालिकेचे अंदाजपत्रक सादर

Fri Feb 23 , 2024
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विपीन पालिवाल यांनी २०२३-२४ चा सुधारित व २०२४-२५ चा प्रस्तावित असा एकत्रित अर्थसंकल्प सादर केला असुन शिलकीच्या या अर्थसंकल्पात शहरातील विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. महसुली अनुदान आणि करापासून मिळणारे उत्पन्न यातून हा खर्च करण्यात येणार आहे. २०२३-२४ चे सुधारित अंदाजपत्रक ४३७ कोटी ३७ लाख ३ हजार रुपयांचे असून, २०२४-२५ चे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com