नागपुर :- पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीत, रामबाग, बैद्यनाथ चौक, सरकारी शौचालयामागे, ईमामवाडा, नागपुर येथे राहणाऱ्या फिर्यादी संगीता सुर्यभान लोड, वय ५० वर्ष यांचे पती बाहेरगावी गेल्याने त्या त्यांचे घराला लॉक लावून नातेवाईकाकडे झोपण्याकरीता गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून किचन रूम डब्यामधील नगदी १५,०००/- रू चोरून नेले. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो ठाणे ईमामवाडा येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ४५७, ३८० भादवि अन्यये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात पो. ठाणे ईमामवाडा चे अधिकारी व अमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापळा रचुन आरोपी देवांश संदिप इंगळे, वय १९ वर्षे, रा. इमामबाडा, बोधीसत्व विहाराचे मागे, नागपुर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, आरोपीने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी कडुन गुन्यात चोरी गेलेली रक्कम जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास पोहवा. रविंद्र राजा हे करीत आहे.
वरील कामगिरी वपोनि ईमामवाडा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि कोल्हारे, पोहवा रविंद्र राउत, अमीत पाने नापो सुशिल रेवतकर, सदिप गोडसरे, पोअ देवेन्द्र भोंडे, रजित सिक्कलवार, विरेन्द्र गुरांडे यांनी केली.