संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी शहर क्राईम हब च्या मार्गावर
कामठी :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या गृहक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कामठी शहरात गुन्हेगारीचा ग्राफ वाढीवर असून हे शहर क्राईम हब च्या मार्गावर आहे तर येथील सर्वसामान्य नागरिक स्वतःला असुरक्षित मानीत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढीवर असून पोलिसांचा अभयपणा तयार झाला आहे तेव्हा पोलिसांच्या या अभयपणाला कोण जवाबदार? असा प्रश्न येथील जागरूक नागरिक वर्ग करीत आहे.
सद्रक्षणाय-खलनिग्रहनाय हे ब्रीदवाक्य बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांची येथील सर्वसामान्य नागरिकापासून ते आरोपी वर्गातील गुंडप्रवृत्ती नागरिकांना कुठलीही भीती न राहिल्याने पोलिसांच्या या अभयपणाला कोण जवाबदार?मिळालेला मानवाधिकार की वाढत असलेला भ्रष्टाचार या चर्चेला उधाण मिळत आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या परिमंडळ क्र 5 हद्दीतील स्थानिक नवीन व जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांनी आपले जाळे पसरवले असले तरी बिघडलेली मानसिक विकृती व राग अनावर न घेणे तसेच पोलिसांच्या अभयपणामुळे गुन्हेगारीच्या घटना वाढीस असल्याचे निदर्शनास येते.नुकत्याच मागील महिन्यात नेताजी चौकात रात्री एका घरात शिरून दारूच्या नशेत गोंधळ घालून घरमंडळीना मारझोड केली होती त्यानंतर जुनी कामठी पोलीस स्टेशन मध्ये नागपूर पोलिसांच्या अंगावर धावून गेले होते तर 29 एप्रिल झालेल्या आपसी वादातून कुरेशी नामक तरुणाचा मृत्यु झाला.त्याआधी मागील दोन महिन्यात एम डी तस्करी प्रकरण चांगलेच गाजले.
पोलिसवर्ग जनसामान्यांसाठी सदैव तत्पर राहून कर्तव्यदक्ष भूमिका बजावून नोकरी करतो ज्या पोलिसांना हे ब्रीद बाळगून आपले कर्तव्य बजावता येत नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा असे राज्याचे तत्कालीन अप्पर पोलीस महासंचालक डॉ सत्यपाल सिंह यांनी 14 जून 2012 ला संपन्न झालेल्या नवीन कामठी पोलीस स्टेशन च्या नवीन इमारत उदघाटन प्रसंगी बोलत होते.सज्जनांच्या हितासाठी तर दुर्जनांच्या नियमनासाठी असा अर्थ पोलिसांसाठी असला तरी सध्या या अर्थाला काही राम उरलेला नाही. तरीसुद्धा सर्व च पोलीस सारखे नसतात अनेकवेळा पोलिसानी आपल्याप्रति चांगल्या कामाची पावती देऊनही त्याचे मूल्यमापन होत नाही कारण एकाला समाधान तर दुसऱ्याच्या वाट्याला दुःख येत असते.मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1933 च्या कलम 12 प्रमाणे सन 2001 ला महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली या हक्काची पायामल्ली करणाऱ्या च्या विरोधात पीडित व्यक्तीला मानवी हक्क आयोगाकडे दाद मागता येते. देशाच्या राज्यघटनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे मनानुसार जगण्याचा अधिकार आहे हा आयोग स्थापन होऊन नागरिकांना त्याची जाणीव, माहिती झपाट्याने व्हायला लागली ती सर्वसामान्य नागरिकापासून ते गुन्हेगार प्रवृत्तीच्या नागरिकांपर्यंत पोहोचली त्यामुळे पोलिसांचे हात कायद्याच्या चौकटीत एक प्रकारे बांधल्या सारखे झाले परिणामी गुन्हेगारांना मारझोड करता येत नसल्याने गुन्हेगारांची हिम्मत दिवसेंदिवस वाढीवर आहे. त्याचप्रमाणे एखाद्या गुन्हेगारी घटनेत न्यायालय जोपर्यंत एखाद्या गुन्हेगारास पोलीस कोठडीचा आदेश देत नाही तोपर्यंत पोलीसांना त्याला मारझोड ही करत नसल्याचे सांगण्यात येते.
या सर्व बाबींचा विचार केला असता मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीचा ग्राफ वाढीवर असून गंभीर गुन्ह्यांची नोंद दिवसेंदिवस वाढीवर आहे .त्यातही अवैध व्यवसायिकांचे मनोबल वाढलेले आहे तेव्हा कायद्याचे रक्षक म्हणून भूमिका साकारणाऱ्या पोलीस दादांनी या शहरातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासह निर्दोष लोकांचे रक्षण व्हावे यासाठी अभिनव संकल्पना चा उपयोग करून वाढीव गुन्हेगारीला आळा बसवावा अशी मागणी येथील जागरूक नागरिक वर्ग करीत आहे.
आगामी काळात कामठी नगर परिषद निवडणुकीचा ज्वर चढणार आहे दरम्यान प्रतिस्पर्धी आपली रणनीती आखत साम, दाम, दंड , भेद या सर्व बाबींचा वापर करून निवडणूक रिंगणात जिंकण्यासाठी जीवाचे रान करणार आहेत आणि पोलिसांचा अभयपणा असल्यामुळे व पोलिसांचा कुठलाही धाक नसल्यामुळे घरावर हल्ला चढवीने हे सर्वसाधारण झाले आहे तेव्हा या निवडनुकीच्या काळात वैमनस्याच्या स्पर्धा कुणाच्या जीवावर न बेतावे यासाठी आतापासूनच सावधगिरी सांभाळणे गरजेचे आहे मात्र येथील पोलीस प्रशासन शहरातील बिघडलेली स्थिती व निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीत कुठलीही गंभीर्याची भूमिका घेताना दिसत नाही. तत्कालीन डीसीपी अविनाशकुमार यांच्या कर्तव्यदक्ष प्रणालीमुळे येथील अवैध व्यवसायिकांनी आपले बस्तान शहराबाहेर मांडले होते.तर येथील गुंड प्रवृत्तिच्या नागरिकांत ‘अविनाशकुमार’ हा नाव धाकेजुन ठरला होता तर आजही डीसीपी अविनाशकुमार सारख्या कारवाहिचे धाडसत्र पोलिसांनी राबवून नागरिकांना रक्षणाची जाणीव करून द्यावी.’सद्रक्षणाय -खलनिग्रहनाय हे ब्रीद वाक्याची फलित करावे अशी मागणी येथील जागरूक नागरिक करीत आहेत.
@ फाईल फोटो