– ‘पीरिपा’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडेंनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क
मुंबई/नागपुर :- आज राज्यात एकूण 288 मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकांच्या मतदान होत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीणसह विविध योजना सुरू केल्यानंतरही राज्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे, हे सर्वश्रृत जनतेला माहिती आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा ‘महायुती’चेच सरकार येईल. तसेच राज्यात सर्वच मतदारसंघात महायुती उमेदवार मोठ्या मतधिक्क्याने जिंकणार, या बद्दल मनात कोणतीही शंका नाही असा विश्वास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी व्यक्त केला.
राज्याचा दौरा आटोपल्यानंतर नागपुरात परतल्यानंतर बुधवारी सकाळी जयदीप कवाडे यांनी पत्नी सौ. प्रतिमाताई जयदीप कवाडे यांच्यासोबत बुधवारी सकाळी 7 वाजता लक्ष्मी नगरातील पितळे शास्त्री शाळेत येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. अशी माहिती पीरिपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. जयदीप कवाडे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात देशाचा गेल्या दहा वर्षात शेतकरी, गोरगरीब, महिला आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. त्यांनी राबविलेल्या विविध योजनांतून झालेल्या बदलामुळे दारिद्ररेषेतून कोट्यवधी जनता आज बाहेर पडली आहे. त्याच आधारावर आज केंद्रात पुन्हा पंतप्रधान मोदी यांचे सरकार आले आहे. तर राज्यात महायुतीचे सरकारने मोदींच्या नेतृत्वात राज्याच्या विकासाला महत्त्व दिले. तसेच लाडकी बहीणसह विविध योजनांची दखल आज राज्यतील जागरूक मतदार घेत आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा एकदा येणार आहे. नागपुर जिल्ह्यातील 12 विधानसभेतील प्रत्येक मतदार संघातून महायुतीला मतदरांचा कौल दिसून येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विदर्भासह राज्यात महायुतीचा मोठा विजय निश्चीत असल्याचेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले.