ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर चा स्थापना दिवस थाटात संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

-शेकडो विपस्वी साधकांनी घेतला सहभाग

जगातील वर्तमान स्थितीत मनाच्या शांतिकरिता विपस्यना गरजेचे – ऍड सुलेखा कुंभारे

कामठी :- आजचे स्पर्धेचे युग असल्याने जगातील प्रत्येक व्यक्ती अक्षरशा धावत आहे ज्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत.त्यावर उपाय करायचा असेल तर मानवी शांती हवी आणि हीच मानवी शांती हवी असेल तर विपस्यना ध्यान भावन करणे गरजेचे आहे. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटरच्या माध्यमातून नियमित ध्यान शिबिराचे आयोजन करून अनेक साधक याचा लाभ घेत आहेत. यापुढेही हजारोच्या संख्येनी या केंद्राच्या माध्यमातून ध्यान साधनेचा लाभ पोहोचविण्याचे कार्य गतिमान करण्यात येईल असे मनोगत ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर च्या पाचव्या स्थापना दीनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख ,ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केले.

विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात दिनांक 22 सप्टेंबर 2017 ला देशाचे महामहिम माजी राष्ट्रपती यांच्या हस्ते ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर चे उदघाटन संपन्न झाले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले प्रामुख्याने उपस्थित होते. कामठी शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच देशाचे राष्ट्रपती यांनी कामठी शहराला भेट देऊन विपस्यना मेडिटेशन सेंटर चे उदघाटन केले.

गेल्या पाच वर्षांपासून ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर मध्ये नियमित 10 दिवसीय, 3 दिवसीय व 1 दिवसीय शिबिराचे आयोजन केल्या जात आहे. या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात देशाच्या कानाकोपरयातून साधक सहभागी होऊन ध्यान शिबिराचा लाभ घेत असतात. शिबिरामध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य व्यक्तिरिक्त इतर राज्यातुन सुद्धा साधकाना ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर मध्ये ध्यान करण्याची संधी मिळत असल्याची माहिती ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ऍड सुलेखा कुंभारे यांनी दिली.

ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर चा 5 व्या स्थापना दिनानिमित्त आज गुरुवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर येथे विशेष ध्यान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शेकडो साधक साधकांनी या एक दिवसीय ध्यान शिबीरामध्ये सहभाग नोंदवून ध्यान साधनेचा लाभ घेतला.सतत पाऊस असताना मोठ्या संख्येनी साधक उपस्थित होते. शिबिराचे संचालन व मार्गदर्शन सहाय्यक आचार्य कल्पना सोमकुवर व सहाय्यक आचार्य अनिल बन्सोड यांनी केले. शिबीराला माऊरझरी येथील धम्मनाम विपस्यना केंद्राचे प्रमुख विपस्यना आचार्य सुधीर शाह प्रामुख्याने उपस्थित होते.

या एक दिवसीय ध्यान शिबीर यशस्वी करण्याकरिता रेखा भावे, वंदना आळे,विनय बांबोर्डे, सचिन नेवारे,सुनील वानखेडे,शालू सावरकर,सुमन घरडे, किरण गायकवाड, रामटेके गुरुजी,राजेश शंभरकर, सुषमा नागदेवें, रजनी लिंगायत, राजेश गजभिये,भैय्यालाल भोयर, अजित बागडे,विजय अलोने, चंदू कापसे,सुरज मेश्राम इतर धम्मसेवकांनी अथक परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा शाळांना मिळाले प्लास्टिक वेस्ट कलेक्शन डस्टबिन इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्ट तर्फे भेट

Thu Sep 22 , 2022
चंद्रपूर :-  चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असुन विविध उपक्रम या पंधरवाड्यात राबविण्यात येत आहेत. स्वच्छता कार्याला सहयोग म्हणुन मनपाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय व रयतवारी मराठी शाळेला टाकाऊ वस्तुंपासून बनविलेले प्लास्टीक बेंच व प्रत्येकी एक प्लास्टिक वेस्ट कलेक्शन डस्टबिन सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्टतर्फे देण्यात आले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १७ सप्टेंबर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com